आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावर जास्तकाळ मेकअप राहिल्यास त्वचेवरील छिद्रे बंद होतात. त्यासाठी बऱ्याच महिला चेहऱ्यावरचा मेकअप कढण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. महिलांना मस्करा आणि आयलायनर काढण्यासाठी बराच वेळ लागतो. जास्तवेळ मेकअप चेहऱ्यावर राहिल्यास केमिकल्समुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी घरगुती मेकअप रिमूव्हर वापरणे चांगले आहे.
नारळाचे तेल
रिमूव्हर, मॉयश्चरायझर आणि लिपबाम म्हणून नारळाच्या तेलाचा वापर करता येतो. या तेलाने क्लिजिंगही करता येते. मेकअप काढल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. या तेलाचा वापर करून वॉटरप्रुफ मेकअपदेखील काढता येतो.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑइल आणि पाणी एकत्र करून कापसाने चेहऱ्यावर लावावे. ऑलिव्ह ऑइलने मेकअप सहज काढता येतो. हे ऑइल ऍन्टी-एजिंग सुद्धा आहे.
काकडी
काकडीचा तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणूनही वापर करता येतो. काकडी किसून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट क्लींजर म्हणून लावता येते. ही पेस्ट लवल्यानंतर मेकअप काढण्यास त्रास होत असल्यास ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे दूध टाकावे.
दही
चेहयावर दही लावल्याने त्वचा मॉयश्चराइज होते. दह्याने त्वचा स्वच्छ होते. प्लेन दह्यात कापूस भिजवून सर्कुलर मोशनमध्ये फिरवावे. हे लावल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा.
जोजुबा ऑइल
मानवी शरीरातून निघणाऱ्या सीबम सारखे जोजुबा ऑइल असते. हे चेहऱ्याला मॉयश्चराइज करण्यास मदत करते. ६० मि.ली. जोजोबा ऑइलमध्ये एक व्हिटॅटमिन ई कॅप्सूल टाकावी. हे रिमूव्हर गडद रंगाच्या बाटलीत बंद करून ठेवावे. हे ऑइल वॉटरप्रूफ मस्कारा, लिक्विड आयलायनर आणि ब्लश काढण्यासाठी वापरता येते.
कोकोनट, ऑलिव्ह ऑइल आणि बेबी शॅम्पू
हे एक परिणामकारक मेकअप रिमूव्हर आहे. हे लावल्याने कोणत्याही प्रकारचा वॉटरप्रूफ मेकअप काढता येतो. एक कप पाण्यात ८ छोटे चमचे ऑलिव्ह अथवा कोकोनट ऑइल टाकावे. यामध्ये अर्धा मोठा चमचा बेबी शॅम्पू टाकावा. एकत्र केल्यानंतर एका बाटलीत टाकून चांगल्या प्रकारे हलवावे.