आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अॅसिडिटी ही समस्या सामान्य असली तरी ती अलिकडे मोठ्याप्रमाणात वाढत आहे. याचा शरीरावर गंभीर परिणाम होत असतो. अॅसिडिटी दूर करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची औषणे मिळतात, परंतु, ही औषधे घेतल्यावर तात्पुरता आराम मिळतो. कायमस्वरूपी उपचार होत नाही. मात्र, काही घरगुती उपाय केल्याने अॅसिडिटी दूर होऊ शकते.
करा हे उपाय
1 पाण्यामध्ये आले उकळावे आणि ते पाणी प्यावे. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि दुसर्या दिवशी सकाळी ते खावे.
3 जेवणानंतर बडीशेप चावून खावी.
4 बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास केळ्याचे सेवन वाढवावे.
ही आहेत कारणे
1 पदार्थ योग्यरित्या चावून न खाल्ल्यास हा त्रास होतो.
2 ताणतणावामुळेही पचनक्रियेवर परिणाम होतो.
3 खाताना थंड पाण्याचे सेवने करणे.
Visit : arogyanama.com