पटना : पोलिसनामा ऑनलाईन – जर तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय बाळ पाहिजे नसेल तर तुम्हाला नियमितपणे बेलाच्या पानाचे सेवन करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही बेलाच्या पानाचे सेवन कराल तोपर्यंत बाळ होणार नाही. तिलकामांझी भागलपुर विश्वविद्यालय (टीएमबीयू) तील जंतु विज्ञान विभागाचे वरिष्ठ शिक्षक प्रा. विभूति नारायण सिंह यांनी बेलाच्या पानावर संशोधन केले.
बेलाचे चूर्ण खा आणि बाळाचा जन्म टाळा
प्राध्यापक सिंह म्हणाले की, पुरुष जोपर्यंत बेलाच्या पानाचे चूर्ण सेवन करेल तोपर्यंत बाळ होणार नाही. जेव्हा बाळ जन्माला घालण्याची इच्छा होईल तेव्हा चूर्णाचे सेवन बंद केले पाहिजे. हे संशोधन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकामध्ये प्रकाशित झाले आहे. शोधाला मान्यता देखील मिळाली आहे. प्राध्यापक सिंह यांच्यासोबत राजेशकुमार यांनी देखील हे संशोधन केले आहे. आतापर्यंत पुरुष लोकसंख्या नियंत्रणासाठी कंडोम किंवा नसबंदीची मदत घेत आले आहेत.
उंदरावर केला यशस्वी प्रयोग
प्राध्यापक सिंह यांनी १२ उंदरावर संशोधन केले आहे. सहा उंदरांना ०.१५ मिलिग्रॅम बेलाच्या पानाचे चुर्ण खाऊ घातले. दहाव्या दिवशी आढळून आले की उंदरामधील शुक्राणू आणि सीमेनचा पीएच कमी झाला. याचप्रमाणे २० व्या, ३० व्या, ४० व्या आणि ५० व्या दिवसापर्यंत शुक्राणू कमी कमी होत गेले. सीमेनचा पीएच कमी झाला. याशिवाय ६ उंदरांना काहीही न करता सोडण्यात आले. ५० व्या दिवशी आढळून आले की, ज्यांना बेलाचे चूर्ण खाऊ घातले होते त्यांच्यातील शुक्राणूंची संख्या कमी झाले. त्यांची प्रजनन क्षमता कमी झाली. ज्या उंदरांना बेलाचे चूर्ण खाऊ घातले नाही, त्यांच्यामधील शुक्राणू जसेच्या तसे होते. यानंतर चूर्ण खाऊ घातलेल्या उंदरांना चूर्ण बंद केले त्यानंन्तर पुन्हा त्यांच्यातील शुक्राणूंची संख्या हळू हळू वाढली.
बेलाची पाने कॅन्सरविरोधी आणि लिव्हरसाठी फायदेशीर
प्राध्यापक सिंह म्हणाले की, बेलाच्या पानाचे सेवन केल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील कमी होतो. लिव्हरसाठी देखील फायदेशीर ठरत. हे अँटी ऑक्सिडंट प्रमाणे काम करते. ऍलर्जीवर देखील याचा वापर फायदेशीर ठरतो. पोटातील दुखणे देखील यामुळे कमी होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेलाचे फळ खूप फायदेशीर आहे. बेलाच्या पानाचे चूर्ण करून त्या चूर्णाचे दिवसातून दोन वेळेस सेवन केल्यास मधुमेहाचा रोग कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सेवन करून याचे फायदे पाहू शकता. भूख लागत नसेल तर भूख वाढिवण्यासाठी देखील बेलाचे चुर्ण फायदेशीर ठरते. असे बेलाच्या चूर्णाचे अनेक फायदे आहेत.