आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ज्यांना सिगारेटचे व्यसन जडलेले असते, तेच आपल्या व्यसनाचे समर्थन करण्यासाठी काही खोट्या गोष्टींचा आधार घेताना दिसतात. असे लोक व्यसन कसे घातक नाही, अथवा कोणती काळजी घेतल्यास व्यसनाचे गंभीर परिणाम होत नाहीत, हे सांगण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत असतात. मात्र, सिगारेटचे व्यसन घातकच असून त्यामुळे गंभीर आजार होतात, हेच सत्य आहे. सिगारेटच्या व्यसनाबद्दल कोणत्या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, व सत्य काय आहे, हे जाणून घेवूयात.
हे आहे सत्य
१. सिगारेट ओढण्यासोबतच चांगला आहार घेतल्यास नुकसान होत नाही, असे म्हटले जाते. परंतु, सिगारेट ओढण्याचा थेट परिणाम लंग्जवर होत असतो. सिगारेट ओढणे आणि आहार यांचा काहीही संबंध नाही.
२. लाइट अथवा माइल्ड सिगारेटमुळे शरीराचे जास्त नुकसान होत नाही, असे सांगितले जाते. परंतु, लाइट सिगारेट ओढताना व्यक्ती जास्त वेगाने धुर ओढतो. यामुळे सिगारेट कुठलीही असली तरी नुकसान होतेच.
३. ई-सिगारेट शरीरासाठी घातक नाही, असेही म्हटले जाते. परंतु, ई-सिगारेटमध्येही इतर सिगारेटप्रमाणे घातक केमिकल्स असतात. यामुळे कँसरची समस्या होऊ शकते.
४. सिगारेटमधील फक्त निकोटिन आणि टार नुकसानकारक आहे, असेही म्हटले जाते. परंतु, निकोटीन आणि टारशिवाय यामध्ये ऐरोमेटिक हायड्रोकार्बनसारखे अनेक घातक रासायनिक पदार्थ असतात. यामुळे कँसरसुद्धा होऊ शकतो.
५. जर सिगारेट कमी प्रमाणात ओढली तर नुकसान होत नाही, असेही म्हटले जाते. मात्र, कमी प्रमाणात ओढा अथवा जास्त सिगारेटमुळे लंग्जचे नुकसान होतेच. सिगारेटचे प्रमाण कमी केल्याने व्यसन वाढते आणि जास्त सिगारेट ओढली जाते.