आरोग्यनामा ऑनलाईन टीम : खाद्यतेल आणि हृदयाचे आजार यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. कारण अयोग्य तेल स्वयंपाकासाठी वापरत असल्यास त्याचा हृद्यावर वाईट परिणाम होतो. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास सरसोचे म्हणजेच मोहरीचे तेल हे अतिशय लाभदायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कारण यामध्ये फॅटी अॅसिड आणि नैसर्गिक अॅन्टी ऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते.
हे लक्षात ठेवा
१ मोहरीच्या तेलाच्या सेवनाने रक्तातील फॅटचे प्रमाण कमी होते.
२ हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
३ रक्तप्रवाह सुरळीत राहून उच्च रक्तदाबाचा धोका टळतो.
४ कच्च्या घाणीचे मोहरीचे तेल रिफाईन्ड नसते.
५ नैसर्गिक पद्धतीने बनवलेले तेल आरोग्यासाठी अधिक उपयोगी असते.
६ खाद्य तेलात कोलेस्टेरॉल व फॅट असू नये.
कोणते तेल चांगले
खाद्यतेलात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असावे.
मोनोसॅच्युरेटेड व पॉलिसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असावे.
एन ६ व एन ३ अॅसिड गुणोत्तर प्रमाणात असावे.
मोहरीच्या तेलात हे सर्व गुणधर्म आहेत.
Visit : arogyanama.com