आरोग्यनामा ऑनलाइन : (muskmelon face pack) – उन्हात आणि प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज होते. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला खाज सुटणे आणि सनटॅनचा त्रास होण्यास सुरूवात होते. यामुळे खरबूजापासून तयार केलेला फेसपॅक muskmelon face pack सनटॅनची sunburn समस्या दूर करेल त्याचा दुष्परिणामही होणार नाही. खरबूजाने बनविलेले फेसपॅक कसे तयार करावे ते जाणून घ्या….. muskmelon face pack for sunburn and glowing skin
साहित्य
1) खरबूज – १ वाटी
2) दही – १ चमचा
3) मुलतानी माती – २ चमचे
4) गुलाब पाणी – २ चमचे
कसे बनवावे
खरबूज कापून ते ग्राइंडरमध्ये बारीक करुन घ्या. आता या मिश्रणामध्ये मुलतानी माती घालून मिक्स करावे. आता दही आणि गुलाब पाणी घाला. हे तयार फेसपॅक ५ मिनिटे झाकून ठेवा.
लावण्याची पद्धत
हे फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा चांगले स्वच्छ करा. आता मिश्रण चेहर्यावर आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटे कोरडे राहू द्या. आता फेसपॅक हलक्या हाताने पाण्याने चोळा.
आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्याने त्वचा चमकत जाईल.
1) डाग दूर करण्यासाठी
खरबूज लगदयात मध मिसळा आणि ते १५_२० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. हे पॅक त्वचेचे छिद्र उघडते आणि त्वचेतील घाण स्वच्छ करते.
2) टॅनिंग दूर करते
चेहऱ्यावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी दूध खूप फायदेशीर आहे. खरबूजच्या रसात दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा. सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा त्रास टाळण्याबरोबरच ते त्वचेची खोलवर स्वच्छता देखील करते.
3) केसांसाठी फायदेशीर
त्यात इनोसिटॉलचे पर्याप्त प्रमाण असते, ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत आणि चमकदार बनतात. एवढेच नव्हे तर केसांना नैसर्गिक देखील बनवते.
यासाठी १ कप खरबूज बारीक करा आणि शैम्पू केल्यावर या लगद्याने आपल्या केसांवर मालिश करा आणि १० मिनिटांनंतर केस धुवा.
Web Title : muskmelon face pack for sunburn and glowing skin