आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जगभरात मशरूम म्हणजेच आळंबीच्या एक लाख चाळीस हजार प्रजाती आहेत. आतापर्यंत मशरूमच्या फक्त १० टक्के प्रजातींचे गुण शोधण्यात यश आले आहे. बुरशीत तयार झालेल्या आळंबीत भरपूर औषधी गुणधर्म असतात. ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असतात. आळंबीत मोठ्याप्रमाणात पोषक घटक असतात. हे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीमध्ये लक्षणीय वाढ होते.
एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, मशरूममध्ये अँटी-इफ्लेमेंटरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. हे अँटी-इफ्लेमेंटरी कॅरेक्टरिस्टिक्स अस्थमा, अंग आणि हाडदुखी, रेनल फेल्युअर आणि पक्षाघात या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत लाभकारक ठरते. दररोज एक कप पांढरी आळंबी खाल्याने ३.६ टक्के वजन कमी होऊ शकते. १० हजार मशरूमच्या जातींपैकी ५० ते १०० जाती विषारी आहेत, असे मशरूम चुकूनही खाऊ नयेत. एक वाटी मशरूम २० टक्के आहाराचे प्रमाण भरून काढते. वजन कमी करायचे असेल तर रेड मीट खाणे बंद करून त्याच्याऐवजी व्हाइट बटण मशरूम खावे. याचा फायदा सर्व वयोगटातील व्यक्तींना होतो.
आहारात मशरूमचा समावेश केल्याने आहाराची गुणवत्ता वाढते. त्याचप्रमाणे पोषक घटकदेखील मिळतात. वाळलेले व्हाइट बटण मशरूम खाल्ल्याने व्हिटॅमिन डी २ किंवा डी ३ चे प्रमाण वाढण्यास मदत होते. मशरूमचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार क्षमता सक्षम होते. व्हाइट बटण मशरूम रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यात उपयोगी आहेत.