आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डाळींमध्ये खूप प्रोटीन असते असे म्हटले जाते. डाळींमध्ये मूग डाळ खूप हल्की आणि पचनाला ही चांगली असते त्यामुळे ही सगळ्यांसाठी फायदेशीर असते. जर तुम्ही मूग डाळीचे सेवन आठवड्यातून २ वेळा करत असाल तर तुम्हाला यातून व्हीटॅमिन आणि मिनिरल्स तर मिळतात पण यासोबतच आपला अनेक रोगांपासून बचाव होतो. मूग डाळीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक असे अनेकप्रकारचे व्हीटॅमिन्स असतात. मूग डाळीचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया की मूग डाळीचे पाणी पिण्याचे फायदे…
असे बनवा मूग डाळीचे पाणी –
मूग डाळीचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. यासाठी जेव्हा तुम्ही साध्या पद्धतीने डाळ बनवाल तेव्हा यामध्ये २ कप पाणी जास्त घाला आणि याला जास्त वेळ शिजू द्या. डाळ शिजल्यानंतर पाण्यामध्ये मूगाचे सर्व पौष्टिक तत्व येतात.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मूग डाळचे पाणी प्या –
मूग डाळीचे पाणी पिल्याने आपल्या शरीरातील घाण बाहेर पडते. मूग डाळीमध्ये अँटीऑक्सिडंन्स तत्व असतात. यामुळे शरीराला पोषण मिळते. या व्यतिरिक्त मूग डाळीच्या पाण्यामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. यामुळे आतडे आणि लिव्हर चांगल्याप्रकारे साफ होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत डाळीचे पाणी फायदेशीर असते.
का फायदेशील असते मूग डाळ –
मूग डाळीमध्येखूप मिनरल्स आणि व्हीटॅमिन्स व्यतिरिक्त प्रोटीन, रेजिस्टेंट स्टार्च आणि फायबरची मात्रा भरपूर असते. मूगाच्या एक कप शिजलेल्या डाळीमध्ये २१२ कॅलरीज, १४ ग्रॅम प्रोटीन, १५ ग्रॅम फायबर, १ ग्रॅम फॅट, ४ ग्रॅम शूगर, ३२१ मायक्रोग्राम फॉलेट, ९७ मिलिग्राम मॅग्नेशिअम जिंक, ५५ मिलीग्रॅम कॅल्शिअम असतात. याव्यतिरिक्त व्हीटॅमिन बी १ थियामिन, विटॅमिन बी ५ आणि विटॅमिन बी ६ ही असते.
लवकर करा फॅट बर्न –
जर तुम्हाला तुमचे वजन हेल्दी पद्धतीने कमी करायचे असेल तर मूग डाळीचे पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही फक्त तुमची कॅलरी कमी करत नाही तर यामुळे तुम्हाला खूप काळ भूक लागल्यासारखे जाणवत नाही. यामुळे तुम्ही सहज वजन कमी करु शकता. यासाठी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी रोज मूगडाळीचे पाणी पिणे गरजेचे आहे.
मूग डाळीच्या पाण्याने इम्यूनिटी वाढते –
मूग डाळीमध्ये अनेक प्रकारचे व्हीटॅमिन असतात आणि अँटीऑक्सिडंन्स असतात. जे इम्यूनिटी सिस्टमला मजबूत बनविते. मूग डाळीच्या पाण्याने शरीरामध्ये एनर्जी येते.