आरोग्यनामा ऑनलाईन- द्राक्षे वाळवून बेदाणे(Munakka) तयार करतात. यात व्हिटॅमिन, कॅल्शियम लोह, फायबर, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल इ. लोहाच्या योग्य स्त्रोतामुळे त्याचा वापर रक्त वाढविण्यासाठी केला जातो. हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी , घसा खवखवणे, खोकला होतो. त्यावर बेदाणे खाल्ल्यास अनेक आजारांपासून मुक्त होता येते. हाडांसाठी बेदाणे(Munakka) उत्तम आहेत. चला तर मग त्याच्या वापराच्या इतर फायद्यांविषयी जाणून घेऊया ..
1. सर्दी
थंडीत बेदाणे घेणे फायदेशीर मानले जाते. झोपेच्या आधी 2-3 बेदाणे दुधात उकळवून त्या दुधाचे सेवन करावे लागेल. सर्दी आणि खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे कार्य करू शकते.
बेदाणा लोहाचा स्रोत आहे. शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. 10 बेदाणे पाण्यात रात्री भिजवून ठेवा. सकाळी दुधात उकळून गार करू प्या. थकवा आणि अशक्तपणा दूर करून शरीराला सामर्थ्य प्राप्त होते.
3 हाडे
बेदाण्यात कॅल्शियम भरपूर असत. सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. हाडाबाबतच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
4 बद्धकोष्ठता
बेदाणे बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करतात. बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास दुधामध्ये बेदाणे उकळवावे आणि झोपेच्या वेळी हे दूध घ्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.
5. घसा खवखवणे
जर घसा खवखवणे किंवा कोरडेपणा आणि खाज सुटत असेल तर बेदाणे घ्या. बेदाण्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. ज्यामुळे घशातील समस्या दूर होण्यास मदत होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.