आरोग्यनामा ऑनलाईन- ओलावा, दमट हवामान अशा स्थितीत डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होते. डासांचा प्रादुर्भाव टाळला तर अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. कारण सगळ्यात घातक किटकांमध्ये डासांचा समावेश होतो. डास चावल्यामुळे(Mosquito bites) मृत्यूला तोंड द्यावे लागते. कोरोना काळात अशाप्रकारे आजारी पडणे, सध्यातरी परवडणारे नाही. यामुळे अनेक परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. डास चावल्याने(Mosquito bites) कोणते आजार होतात, डांसाचा प्रादुर्भाव कसा टाळावा आणि डास पळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात…
हे गंभीर आजार होतात
1 चिकनगुनिया
2 येल्लो फीवर
3 डेंग्यू
4 मलेरिया
5 झिका
हे उपाय करा
1 कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटे धूर होऊ द्या.
2 दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोप लावा.
3 कडूलिंबाचं तेल आणि खोबरेल तेल एकत्र करुन शरीरावर लावा.
4 लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना दूर ठेवू शकतं.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.