शाकाहारी व्यक्तींना नैराश्याचा धोका अधिक

डिप्रेशनची

आरोग्यनामा ऑनलाइन – शाकाहारी व्यक्तींमध्ये डिप्रेशनची अनेक लक्षणं आढळून येतात. कारण शाकाहारी व्यक्तींमध्ये मांसाहारी व्यक्तींना मिळणारी आयर्नसारखी पोषकत्त्व मिळत नाहीत, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. यामुळं खाण्यापिण्याचा आणि नैराश्याचा संबंध असल्याचेही हे संशोधन सांगतं. हे संशोधन जर्नल ऑफ अफेक्टीव्ह डिसॉर्डरमध्ये प्रसिद्ध झालं असून हे संशाधन करण्यासाठी ९६६८ शाकाहारी गरोदर महिलांच्या पतींचा समावेश संशोधनात करण्यात आला होता.

संशोधनात म्हटल्याप्रमाणे आयर्नच्या कमतरतेमुळे डिप्रेशनची समस्या येऊ शकते. शरीरात आयर्नची कमतरता असली की हिमोग्लोबीनच्या प्रमाणावर देखील परिणाम होतो. शिवाय हायपोथारॉईड्सम हे देखील डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे हे संशोधन करण्यासाठी सगळ्या घटकांची तपासणी करणं गरजेचं आहे. शाकाहारी व्यक्तींमध्ये नैराश्यापेक्षा अनिमिया ही समस्या फार जास्त प्रमाणात दिसून येते. शाकाहारी व्यक्तींमध्ये आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन बी १२ यांची कमतरता अनेक अभ्यासामधून दिसून आली आहे. मात्र या व्यक्तींना जर योग्य आणि संतुलित आहार दिला तर ही कमतरता दूर होऊ शकते.