आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Moong Dal Soup Benefits | मूग डाळ (Moong Dal) चविष्ठ असून ती प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात मूग डाळ समाविष्ट करू शकता (Moong Dal Soup Benefits). वजन कमी करण्यासाठी मूग डाळ एक आरोग्यदायी घटक आहे (Yellow Lentil Soup Benefits). तुम्ही मूग डाळीची भजी, हलवा, भाजी, पराठा इत्यादींची चव चाखली असेलच. मूग डाळ सूप कसे बनवायचे आणि ते पिण्याचे फायदे जाणून घेवूयात (Yellow Lentil Moong Dal Soup Benefits And Its Recipe)…
मूग डाळ सूपमध्ये सुमारे 100 कॅलरीज असतात, ते बनवण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा-
साहित्य : जिरे, लसूण, आले, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथेंबिर, काळी मिरी, आमचूर, कसुरी मेथी, मीठ, भाज्या.
कृती (Recipe) :
– मूग डाळ सूप बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप गरम करा.
– जिरे घालून तुपात तळून घ्या.
– आता आल्याची पेस्ट घालून मिश्रण तळून घ्या.
– आता डाळ धुवून घाला, दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.
– आवडीच्या भाज्या घालून दोन मिनिटे परतून घ्या.
– आच कमी करून त्यात चिरलेल्या भाज्या घालून शिजवा.
– मीठ घालून 2 वाट्या पाणी घालून 2 शिट्ट्या होईलपर्यंत शिजवा.
– आता गॅस बंद करून कुकर झाकून ठेवा.
– डाळ फेटून घ्या.
– त्यात काळी मिरी, आले, जिरे, आमचूर, कसुरी मेथी घालून परता.
– आता गरम सूप तयार आहे, ते एका भांड्यात काढून प्या.
मूग डाळीचे सूप पिण्याचे फायदे (Yellow Lentil Soup Benefits)
1. मूग डाळीचे सूप प्यायल्याने कमी होते वजन (Yellow Lentil Soup Helps In Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मूग डाळ सूप पिऊ शकता. मुगाच्या डाळीच्या सूपमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण चांगले असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. (Moong Dal Soup Benefits)
2. मूग डाळ सूप प्यायल्याने वाढते इम्युनिटी (Yellow Lentil Soup Benefits Helps To Boost Immunity)
मूग डाळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, फोलेट, फायबर, व्हिटॅमिन बी 6 असते, ज्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते. मूग डाळीचे सेवन केल्याने बीपी नियंत्रणात राहतो, ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनीही या सूपचे सेवन करावे. मूग डाळीचे सूप खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन लेव्हल नियंत्रित राहते.
3. मूग डाळ सूप प्यायल्याने होत नाही पोटाचा त्रास (Yellow Lentil Soup Is Good For Digestion)
मूग डाळीचे सूप प्यायल्याने अपचनाचा त्रास होत नाही. मूग डाळीमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे पोटात गॅस तयार होत नाही आणि पचनक्रियाही चांगली राहते.
4. मूग डाळ सूप प्यायल्याने वाढते रक्त (Yellow Lentil Soup Helps To Increase Blood)
मूग डाळीचे सूप प्यायल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. मूग डाळीमध्ये आयर्नचे प्रमाण चांगले असते, जे लाल रक्तपेशी वाढवते आणि अॅनिमियाची समस्या दूर करते, ज्या महिलांना अॅनिमियाची तक्रार असेल त्यांनी याचे सेवन करावे.
5. मूग डाळ सूप प्यायल्याने कंट्रोल राहते ब्लड शुगर लेव्हल (Yellow Lentil Soup Helps To Control Blood Sugar Level)
मूग डाळीचे सूप सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ते जरूर सेवन करावे. मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल राखली जाते.
मूग डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते, ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका.
Web Title :- Moong Dal Soup Benefits | moong dal Yellow Lentil soup benefits recipe in marathi