आरोग्यानामा ऑनलाइन टीम – आपली मनस्थिती म्हणजेच मूड ठीक नसेल तर त्याचा एकुणच परिणाम आपल्या दिवसभराच्या कामकाजाचवर होतो. शिवाय, असे वारंवार होत असेल त्या त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. यासाठी चांगला मूड राहणे हे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या स्थितीचा आजूबाजूच्या लोकांवरही चांगला-वाईट परिणाम होत असतो. कधी-कधी यामुळे नात्यात दुरावासुद्धा येऊ शकतो. मूड चांगला होण्यासाठी काही सोप्या पद्धती असून त्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
मूड चांगल्या होण्यासाठी उपाय
* स्ट्रेचिंग हा यावर सर्वात चांगला उपाय आहे. यामुळे स्नायू सैल होऊन खूप हलके हलके वाटते.
* मूड बिघडला असल्यास कामात लक्ष लागत नाही. शिवाय, यामुळे तणाव अधिक वाढत जातो. अशा वेळी आनंद देणारी काही कामे करावीत. म्हणजे गाडी धुवावी, तुमची जूनी कागदपत्रे अथवा चांगल्या आठवणींचे फोटो बघत बसा, यामुळे चांगला परिणाम होतो.
* बाग केल्यास तुमचा मूड चांगला होऊ शकतो. रोपट्यांची निगा राखणे, पाणी घालणे व नवी रोपटी लावणे यामुळे मनाला आनंद मिळतो. बाग असल्याने पक्षी सुद्धा पाहण्याचा आनंद घेता येईल.
* मूड खबराव झाला असल्यास जोडीदारासोबत थोडा वेळ घालवा. यामुळे त्रस्त करणाऱ्या विचारांपासून मुक्ती मिळू शकते.
* झोपण्याआधी मुलांना गोष्ट सांगावी. त्यांच्याशी कोणत्यातरी चांगल्या विषयावर बोलावे. त्यामुळे मुले खुश होतील आणि तुम्हालाही बरे वाटेल.
* एखादे विनोदी पुस्तक वाचा, अथवा विनोदी चित्रपट पहा, यामुळे मूड चांगला होण्याची खूपच जास्त शक्यता असते.
* मूड खराब असेल तर जागरण करू नका. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून बाहेर फिरून या.