आरोग्यनामा ऑनलाईन टीम- पावसाळा हा ऋतू सर्वांना आवडतो. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहता असतात. पण तो आला तर अनेक आजरांना आपल्या सोबत घेऊन येतो. मग यामध्ये आपल्या त्वचेलाही सुटका नसते. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेचीही आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पावसाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खाली काही घरगुती स्क्रब दिले आहेत.
१) चंदन पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर मुलतानी माती यांची पेस्ट तयार करा. आणि त्वचेच्या डेड स्किनला लावा.हे स्क्रब त्वचेला तजेलदार बनवेल.
२) घरी स्क्रब बनवण्यासाठी २ चमचे बेकिंग सोडा, १ चमचा दालचिनी पावडर, अर्ध्या लिंबाचा रस आणि ५ चमचे मध यांची पेस्ट तयार करून त्वचेला लावा. ५ मी. नंतर चेहरा धुऊन काढा. याचा उपयोग आठवडयातून २ वेळाच करा.
३) पावसाळ्यात ऍलर्जी सारख्या अनेक समस्या असतात. त्यासाठी आपण दुकानातील साबण न वापरता घरीच पावडर तयार करू शकता. ती बनवण्यासाठी चण्याची पावडर आणि चण्याच्या डाळीची पावडर सम प्रमाणात घ्या. यात अर्ध्या प्रमाणात मेथी मिक्स करा. आणि यामध्ये गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. हे मिश्रण आपल्या त्वचेला तरुण बनवेल.
४) मुलतानी माती, चण्याचं पीठ आणि चंदन पावडर समप्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण एका बंद डब्यात भरून ठेवा. हे त्वचेवर लावण्याआधी त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करा. आणि त्वचेला थोडा वेळ लावून ठेवा. सुकल्यानंतर याला थंड पाण्याने धुवा. हे आपल्या चेहऱ्याला साफ करेल.