आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुमारे दोन वर्षांपूर्वी मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले होते. माकड आणि उंदरांमध्ये या आजाराचे विषाणू आढळून येतात. सर्वप्रथम या आजाराने ग्रस्त असलेले रूग्ण 2003 मध्ये अमेरिकेमध्ये आढळून आले होते. तेव्हा या आजाराचे विषाणू गेंबियन प्रजातीच्या उंदरामध्ये आढळून आले होते. त्यानंतर नायजेरिया आणि इंग्लंडमध्येही याचे रूग्ण आढळले होते. मंकीपॉक्स मुख्यतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकेमध्ये आढळून येतो.
ही आहेत लक्षणे
1 लागण झालेल्या व्यक्तीला ताप येतो.
2 डोकेदुखीचाही त्रास होतो.
3 शरीरामध्ये सूज येते.
4 स्नायूंवर ताण येतो.
5 एनर्जी कमी होते.
6 शरीरावर लाल पूरळ येतात.
7 नंतर पूरळ जखमांमध्ये रूपांतरित होतात.
हे आहेत उपाय
अद्याप या आजारावर औषध नाही. मंकीपॉक्सने त्रस्त व्यक्ती काही आठवड्यानंतर बरा होतो. लहान मुलांमध्ये या आजाराचे फार गंभीर परिणाम दिसून येतात, असे लंडनमधील रॉयल फ्री हॉस्पिटलचे डॉक्टर मयकल जॅकब यांनी म्हटले आहे.