आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतात अनेक वर्षांपासून चायनिज फूडची चलती आहे. बहुतांश रस्त्यांवरील टपर्यांमध्येही चायनिज मिळते. तसेच चायनिजची अनेक मोठी हॉटेल्सही आपल्याकडे ठिकठिकाणी दिसतात. चायनिज पदार्थांमधील मोमोज हा पदार्थ तरूण आणि लहान मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. परंतु, हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. मोमोजसाठी मैदा वापरण्यात येतो. यामुळे अनेक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. मैद्याला पांढरा रंग आणि चमकदार बनवण्यासाठी बेंजोइल पॅराऑक्साइडने ब्लीच करण्यात येते. काही घातक रसायने वापरून मैदा मुलायम केला जातो.
हे आहेत धोके
1 आतड्यांचे नुकसान होते.
2 आतड्यांमधील इन्सुलिन बनवण्याची क्षमता कमी होते.
3 थेट पॅनक्रियावर परिणाम झाल्याने इन्सुलिन हार्मोन्सचे सेक्रेशन व्यवस्थित होत नाही.
4 मधुमेहासारखे गंभीर आजार होतात.
5 यातील निकृष्ट पदार्थांमुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असते.
6 यातील चटणीमुळे पोटाच्या अनेक समस्या होण्याची शक्यता असते.
7 पचनतंत्र कमजोर होण्याची शक्यता असते.