‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहरा सुंदर दिसण्यासाठी सध्या बाजारात अनेक सौंदर्य प्रसादने उपलब्ध आहेत. परंतु यांच्या वापरामुळे आपल्या कधी कधी चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. आणि काही महिलांना कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी आपल्याला घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात. आणि या उपायांमुळे चेहऱ्याला काही बाधा पोहचत नाही. त्यामुळे चेहरा सुंदर आणि टवटवीत बनवण्यासाठी खालील काही घरगुती उपाय आहेत.

चेहरा मॉइश्चरायईज करण्यासाठी घरगुती उपाय खालीलप्रमाणे :

१)  कोरफड :
घरच्या घरी चेहरा सुंदर आणि टवटवीत बनवण्यासाठी कोरफड हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण, त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरते. यामध्ये असणारे बीटा-कॅरोटीन, विटॅमिन सी आणि ई त्वचेला स्वस्थ ठेवतात. यासाठी कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. आणि काही वेळाने धुवून टाका. याने चेहऱ्याला चांगली चमक येईल.

२) काकडी :
काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे काकडी त्वचेचं मॉइश्चरायजेशन चांगल्या पद्धतीनं करू शकते. काकडीचा रस चेहऱ्यावर आणि मानेवर अर्धा तास लावून ठेवा. याने तुमच्या त्वचेला फायदा होईल.

३) मध :

त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध याच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते. आणि त्वचा उजळतेही यामुळे, चेहरा, हाता-पायाची चमक कायम राहते.

४)

file photo

तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही तरुण दिसते. एक सूती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १० मिनिटांपर्यंत झाकून ठेवा. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्या.याने तुमची त्वचा चांगली मॉइश्चरायईज होते.