आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर २०१५ सालापासून हा दिन पाळण्यास सुरुवात झाली. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनासाठी पुढाकार घेतला आहे. मागच्याच आठवड्यात त्यांचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ त्यांनीच ट्विटरवर पोस्ट केला होतो.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनतेने काही गोष्टी ठरविल्या पाहिजेत. शरीरस्वास्थ्य नीट राखण्यासाठी योगासनांचा खूप उपयोग होतो. त्यामुळे योगासनांना प्रत्येकाने आयुष्याचा अविभाज्य भाग बनविले पाहिजे.तसे करण्याची प्रेरणा इतरांनाही दिली पाहिजे,असे आवाहन मोदी यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर २०१५ सालापासून हा दिन पाळण्यास सुरुवात झाली. उत्तर गोलार्धात २१ जून हा वर्षभरातील सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे याचदिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांंच्या आमसभेत २७ सप्टेंबर २०१४ रोजी केलेल्या भाषणात सुचविले होते.योगा दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडिओत मोदी त्रिकोणासन करीत असल्याचे दिसते. गेल्या वर्षीही नरेंद्र मोदी यांनी स्वत: योगासने करीत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यंदा केंद्र सरकारतर्फे दिल्ली, सिमला, म्हैसूर, अहमदाबाद, रांची येथे विशेष कार्यक्रम होणार आहेत. योगासाठी होत असलेला हा मोठा सार्वजनिक उपक्रम ठरणार आहे.