आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Miscarriage – Abortion | गर्भपाताची स्थिती खरोखरच खूप वेदनादायक असते कारण आई बनण्याची भावना प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात खूप विशेष असते. गर्भपात (Miscarriage) झाल्यानंतर स्त्रिया शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कमजोर होतात. कोणत्याही स्थितीत गर्भपात होणे स्त्रियांसाठी खूप वेदनादायक असते. गर्भपातानंतर भावनिक आधारासह शरीराला पोषणाचीही गरज असते. (Miscarriage – Abortion)
काही वेळा चुकीमुळे गर्भपात (Abortion) होतो किंवा काही वेळा महिलांना जाणूनबुजून गर्भपात करून घ्यावा लागतो. शस्त्रक्रियेनंतर, स्त्रियांना रक्तस्त्राव, छातीत दुखणे, थकवा, ओटीपोटात दुखणे आणि पेटके आणि उलट्या होऊ शकतात.
गर्भपातानंतर, वारंवार चक्कर येणे, अस्वस्थता आणि डोकेदुखी आणि अशक्तपणा येतो. याव्यतिरिक्त, शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वांची कमतरता देखील असू शकते. अशा स्थितीत सकस आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. जेणेकरून शरीर लवकर बरे होते. (Miscarriage – Abortion)
भरपूर आयर्न घ्या :
गर्भपाताच्या वेळी रक्तस्त्राव झाल्यास शरीरात आयर्नची कमतरता होऊ शकते. आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. आयर्न लाल रक्तपेशी बनवून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करते.
आयर्न आणि व्हिटॅमिन-सीची कमतरता पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत पालक, खजूर, बीन्स, हिरव्या पालेभाज्या, मनुका, कडधान्ये, भोपळ्याच्या बिया, सोयाबीन, ब्राऊन राईस, डार्क चॉकलेट आणि भोपळा इत्यादी आयर्न आणि व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचे सेवन करावे.
कॅल्शियम युक्त पदार्थ :
गर्भपात झाल्यानंतर हाडे आणि स्नायू निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण झपाट्याने कमी होते.
अशा स्थितीत कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. यासाठी आहारात सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ, दूध, सीफूड,
हिरव्या पालेभाज्या आणि सोया, टोफू, भेंडी, ब्रोकोली आणि दूध यांचा समावेश करावा.
हे सेवन करू नका :
– गर्भपातानंतर जंक फूड आणि स्ट्रीट फूड खाऊ नये.
– जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गोड पदार्थ टाळावेत.
– कँडीज आणि कार्बोनेटेड पेये टाळा, कारण यामुळे ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार होऊ शकतो.
– चरबीयुक्त मांस आणि दुग्धजन्य पदार्थ (लोणी, चीज, कच्चे दूध आणि मांस इ.) खाऊ नये.
– कोणत्याही प्रकारचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Miscarriage – Abortion | pregnancy news in marathi after miscarriage women should include these 6 foods in their diet they can be beneficial for health
Sudden Weight Loss | जलदगतीने वजन कमी होणे हे ‘या’ 4 गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, जाणून घ्या