आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही भागातील आदिवासी बांधव विंचू दंशावर पुदिन्याचा औषध म्हणून वापर करतात. पुदिन्यात औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्याने त्याचा विविध आजारात उपयोग केला जातो. पुदीना वायुहारक, पाचक व वातानुलोमन आहे. पुदिना कोणकाणत्या आजारात उपयोगी आहे, हे जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय –
१) एक ग्लास पाण्यात दहा पुदिन्याची पाने, थोडेसे काळे मिरे, मीठ टाकून पाणी उकळवा. हे पाणी गाळून पिल्यास सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये आराम मिळेल.
२) पुदिन्याच्या पानांचा रस आणि अद्रकाचा रस समान मात्रेमध्ये एकत्र करून ताप आलेल्या रुग्णाला दिल्यास आराम मिळेल.
३) पुदिन्याची पाने डाळिंबाच्या दाण्यांसोबत बारीक करून अद्रकाच्या रसात मिसळून सेवन केल्यास पोटदुखी आणि अतिसारात आराम मिळतो.
४) सतत चक्कर येत असल्यास पुदिन्याच्या पानांचा रस घ्यावा. चक्कर आल्यास याच्या रसाचे २ ते ४ थेंब नाकात सोडावे.
५) सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना १ ते २ चमचे पुदिन्याच्या पानांचा रस घेतल्यास मंद झालेली भूक सुधारते.
६) पुदिन्याच्या वाळलेल्या पानांच्या चूर्णाने दात घासल्यास तोंडातील दुर्गंधी दूर होते. दात आणि हिरड्या मजबूत होतात.
७) विंचू चावल्यास पुदिन्याच्या पानांचा रस किंवा पान विड्याच्या पानात टाकून खाल्ल्यास विषाचा प्रभाव कमी होऊ लागतो, असे काही आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.
८) पुदिन्याची पाने बारीक करून त्यामध्ये तीन थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चेहऱ्यावरील मुरुमावर लावा. पाच मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
९) पुदिन्याच्या पानांचा एक-एक थेंब रस नाकात टाकल्यास सर्दी कमी होते.
१०) काळे मिरे, पुदिना आणि मीठ हे मिश्रण एकत्र खाल्ल्यास सर्दीमध्ये लवकर बरी होते.