‘दूध’ आणि ‘जेष्ठमध’ शरीराला बनवेल ‘पावर’फुल ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धावपळ , खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी , बदललेली लाइफस्टाइल यामुळे लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पौष्टिक अन्न न मिळाल्याने शारीरिक क्षमता कमजोर होतात. शरीराची ताकत (पावर) वाढवण्यासाठी लोक अनेक प्रकारची औषधे घेतात. मात्र औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय केले तर लवकर फरक पडेल. शारीरिक क्षमता दुपटीने वाढवण्यासाठी रोज रात्री दुधात जेष्ठमध टाकून प्या.
या पद्धतीने घ्या जेष्ठमध आणि दूध –
जेष्ठमधाची पावडर बनवून ठेवा. आणि रोज रात्री झोपताना अर्धा चमचा जेष्ठमधाची पावडर एक ग्लास दुधामध्ये टाकून प्या. सात दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.
आयुर्वेदात दूध आणि जेष्ठमधाला फार महत्व आहे. दुधाला परिपूर्ण अन्न मानले जाते. दूध हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दुधात कार्बोहायड्रेट्स, फॅट्सबरोबरच , जीवनसत्वेसुध्दा मुबलक असतात. याशिवाय आयर्न, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबे, पोटॅशियम, सेलेनियम, झिंक, फॉस्फरस ही खनिजे उत्तम प्रमाणात उपलब्ध असतात.
तर जेष्ठमधाचे अनेक औषधी उपयोग आहेत. चवीला गोड असणारे ज्येष्ठमध कॅल्शियम, ग्लीसारायजक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे. ज्येष्ठ मध हे वात, कफ, पित्त दोषांना शमवते. ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडीत विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे यासारखे विकार दूर होतात.
Comments are closed.