• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

काय असते Menorrhagia ? जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास आणि काय आहेत याचे उपचार

by Sajada
September 29, 2020
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
Menorrhagia

Menorrhagia

2
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाईन –  (Menorrhagia)मेनोरेजिया बर्‍याच महिला पिरियड्समध्ये पोटात तीव्र वेदना आणि अधिक रक्तस्त्राव झाल्याची तक्रार करतात. या असामान्य स्थितीस मेनोरेजिया(Menorrhagia) म्हणतात. मेनोरेजियामध्ये रक्तस्त्राव इतका होतो की, दर तासाला पॅड बदलण्याची गरज भासते. याशिवाय मेनोरेजियामध्ये संपूर्ण वेळ पोटात वेदना होत असते आणि दैनंदिन काम करण्यातही अडचण येते. त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घेऊया.

मेनोरेजियाची लक्षणे 

मेनोरेजियामध्ये महिलांना दर तासाला पॅड बदलावे लागते. रात्री झोपतानाही पॅड बदलण्याची आवश्यकता असते. बर्‍याच वेळा अधिक रक्तस्त्राव रोखण्यासाठी एकाच वेळी दोन पॅड लावण्याची आवश्यकता असते. वेदनेमुळे कोणतीही कामे करण्यात अडचण येते. रक्तस्रावात रक्ताच्या गुठळ्या येतात. ७ दिवसांपेक्षा अधिक रक्तस्त्रावासह पिरियड्स येतात. या दरम्यान थकवा जाणवतो आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. 
 
काय असतो मेनोरेजिया?
मेनोरेजियामुळे एनिमियासह अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. एनिमियामुळे शरीरात रक्त कमी होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या व्यतिरिक्त मेनोरेजियामुळे बर्‍याच गंभीर समस्या उद्भवतात.

हार्मोन्सच्या समस्यांमुळे 
महिलांच्या युटरसमध्ये दरमहिन्याला एक थर तयार होतो, जो पिरियड्स दरम्यान रक्तस्त्रावाद्वारे शरीराबाहेर येतो. हार्मोन्सची पातळी खराब झाल्यावर हा थर खूप जाड होतो आणि त्यामुळे अधिक रक्तस्त्राव होतो. ओव्हॅल्युएट नसतानाही शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो.

युटरस वाढणे 

युटरसच्या थरामध्ये पॉलीप्स वाढू लागते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. याशिवाय युटरसमध्ये फायब्रॉइड ट्यूमर झाल्यामुळेही महिलांना बराच काळ रक्तस्त्राव होतो.

गरोदरपणाशी संबंधित समस्या असल्यास
जेव्हा फर्टीलाइज्ड अंडे गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागते, तेव्हा त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. अशा प्रकारच्या गर्भधारणेत बर्‍याच समस्या येतात. यापैकी अति रक्तस्त्राव ही एक मोठी समस्या आहे.

 
कर्करोगामुळे 
हे फार क्वचित घडते, परंतु गर्भाशयाच्या किंवा ओव्हरी कर्करोगामुळेही काही महिलांना अधिक रक्तस्त्राव होतो.
 
काही औषधांमुळे
शरीरात जळजळ आणि सूज कमी करणाऱ्या औषधांमुळे देखील हेवी पिरियड्स होतात.

मेनोरेजियाचा उपचार 
अधिक रक्तस्त्राव होण्याच्या काही प्रकरणांमध्ये डॉक्टर गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. या औषधांमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलते, ज्यामुळे अधिक रक्तस्त्राव कमी होऊ लागतो. डॉक्टर अधिक रक्तस्त्राव टाळण्यासाठी काही इतर औषधेही लिहून देऊ शकतात. ही औषधे तुम्हाला पिरियड्स दरम्यानही घ्यावी लागतील.

सर्जरी

जर तुमच्या शरीरात पॉलीप्स किंवा फायब्रॉईड आहे, तर डॉक्टर तुम्हाला सर्जरी करण्याचा सल्ला देखील सल्ला देऊ शकतात. शस्त्रक्रियेनंतर अधिक रक्तस्त्राव होण्याची समस्या थांबेल.

गर्भाशयाची स्वच्छता
डॉक्टर युट्रसवरून थर काढून स्वच्छता देखील करू शकतात. त्याची सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे डायलेशन आणि क्युटेरेज. यामुळेही अति रक्तस्त्राव थांबतो. काही महिलांना हे एकापेक्षा जास्त वेळा करावे लागते.

हिस्टेरेक्टॉमी

अति रक्तस्त्राव होण्याच्या गंभीर प्रकरणांमध्ये ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. यासाठी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक असते. यानंतर तुम्हाला पीरियड्स येणार नाहीत. तसेच गर्भधारणा पुन्हा शक्य नाही. 
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipshealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsMenorrhagiaTreatmentWomenअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनउपचारत्रास
सायलंट किलर आहे ‘हा’ आजार, तुम्‍ही असे ओळखू शकता याचे संकेत
माझं आराेग्य

‘ही’ 6 लक्षणं आढळल्यास समजून घ्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नाही !

July 12, 2020
cold
Uncategorized

थंड खाल्ल्याने कान आणि घशात खाज येत का ? ‘हे’ 5 उपाय करा, असू शकते ’ही’ समस्या, जाणून घ्या

September 29, 2020
जेवणानंतर ‘स्वीट डिश’ खाताये? सावधान या समस्या होतील
Food

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

July 9, 2019
डॉक्टर
ताज्या घडामाेडी

पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ७० होणार

April 22, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

1 day ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

2 days ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

2 days ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.