आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | कोणत्याही आजाराचे योग्यवेळी निदान झाल्यास वेळीच उपचार करता येतात. यामुळे संबंधीत आजार बरासुद्धा होऊ शकतो. यासाठी काही वैद्यकीय चाचण्या ह्या वेळेवर केल्या पाहिजेत. यामुळे भविष्यातील धोका टाळता येतो. सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी हे आवश्यक आहे. यासाठी पुरूषांनी ठराविक कालावधीनंतर कोणत्या टेस्ट कराव्यात याविषयी जाणून घेवूयात. (Health News)
या टेस्ट करा
कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदयाची समस्या होते. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. ब्लड टेस्ट केल्यास धोकेदायक कोलेस्टेरॉल समजते.
डायबिटीजकोलेस्टेरॉल
डायबिटीजमुळे स्टड्ढोक, किडनी समस्या, आंधळेपणा, नर्व डॅमेज आणि नपुसंकता, असे आजार होतात. यासाठी डायबिटीजचे वेळीच निदान होणे गरजेचे असते. यासाठी ब्लड शुगर टेस्ट, ग्लुकोज टॉलरेंस टेस्ट आणि ए१सी टेस्ट केली जाते. ४५ वर्ष वयानंतर दर तीन महिन्यांनी या टेस्ट आवर्जून कराव्यात.
एचआयव्ही
एचआयव्हीचे निदान ब्लड टेस्टने होते. यासाठी एलिझा किंवा इआयए टेस्ट केली जाते. अनेकदा अधिक स्पष्ट निदानासाठी वेस्टरेन ब्लॉस्ट एसे नावाची दुसरी टेस्ट केली जाते.
ग्लूकोमा
या आजाराच्या निदानासाठी 40पेक्षा कमी वयाच्या लोकांनी दर दोन वर्षात एकदा, 40 ते 64 वयोगटातील पुरुषांना वर्षातून एकदा आणि 65 वर्षावरील लोकांनी दर सहा महिन्यांनी एकदा ही टेस्ट करावी.
प्रोस्टेट कॅन्सर
प्रोस्टेट कॅन्सरचे योग्यवेळी निदान झाले तर या जीवघेण्या आजारापासून वाचले जाऊ शकते. यासाठी डिजिटल रेक्टम टेस्ट आणि प्रोस्टेट स्पेसिफिक एंटीजन ब्लड टेस्ट अशा दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात.
टेस्टीकुलर कॅन्सर
या कॅन्सरने पुरूषांचा रिप्रोटेक्टिव्ह ग्लॅँड प्रभावित होतो. या आजाराच्या विळख्यात 20 ते 54 वयोगटाचे पुरुष येतात. यासाठी टेस्टीकुलर टेस्ट करावी.
हाय ब्लड प्रेशर
हाय ब्लड प्रेशरमुळे ह्रदयाला मोठा धोका असतो. यासाठी वेळोवेळी ब्लड प्रेशरची टेस्ट करावी.
Dengue symptoms | Dengue virus | डेंग्यू म्हणजे काय? लक्षणे कोणती? उपचार जाणून घ्या
Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे