आरोग्यनामा ऑनलाईन – पोटातील वायू अन्ननलिकेमध्ये गेल्यानंतर तो गळा आणि तोंडातून बाहेर पडतो. त्यावेळी जो आवाज होतो. त्याला ढेकर देणे असे म्हणतात. पोट भरले की ढेकर येतो असा संकेत असला तरी सतत ढेकर येणे हे चांगले लक्षण नाही. अनेकदा अॅसिड रिफ्लेक्स, अॅसिडिटी आणि अनेक गंभीर समस्यांमुळे असे होत असते. त्यामुळे ढेकर तृप्तीचा आहे की, अन्य कारणामुळे येत आहेत यातील फरक ओळखून आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
कार्बोनेटेड डिंक्स, जंक फूड, कोबी, वाटाणे, डाळ यांसारखे पदार्थ पोटात गॅस तयार करतात. धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती सिगरेटच्या धुरासोबत खूप हवा आतमध्ये खेचून घेतात. ही हवा ढेकरमार्फत बाहेर येते. तसेच तणावामुळे ओव्हरइटिंग केल्यास सतत ढेकर येतात. पोटामध्ये अल्सर झाल्यामुळेही सतत ढेकर येतात आणि छातीमध्ये जळजळ होते. छोट्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढल्यामुळे सतत ढेकर येऊ शकतात. बॅक्टेरियामुळे लहान आतड्यांचा हिस्सा प्रभावित होऊन सतत ढेकर येतात. जेवताना पटापट जेवणे किंवा मोठे मोठे घेतल्याने त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. खाताना तोंड उघडल्यानंतर हवा पोटामध्ये जाते आणि ढेकर येतात. पोट खराब झाल्याने पोटामध्ये गॅस तयार होतो. अन्न पचवण्यासाठी मदत करणारे पोटातील बॅक्टरियांचे संतुलन बिघडल्यामुळे पोटात गॅसची समस्या होते.
पोट रिकामे असल्यास रिकाम्या पोटामध्ये हवा भरते आणि हिच हवा बाहेर येते, त्यास ढेकर म्हणतात. सतत ढेकर येत असतील तर काही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी जेवताना तोंड बंद करून आणि घास चावून खाणे आवश्यक आहे. तसेच जेवताना बोलू नये.
पाणी, चहा किंवा इतर अनकार्बोनेटेड पेय घेतले पाहिजे. कार्बोनेटेड पेय पदार्थांमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होतो. कार्बोनेटेड पेयाचे लहान लहान घोट घेतल्यास ढेकर येणार नाहीत. बीन्स, डाळ, ब्रोकली, फ्लॉवर, कोबी, सलाड, कांदा, चॉकलेट, सफरचंद यांसरख्या पदार्थांचा कमी समावेश करावा. भाज्या उकडताना वाफेवर उकडाव्यात. त्यामुळे पचनक्रियेमध्ये मदत करणारे भाजीमधील नैसर्गिक एंजाइम्सस सुरक्षित राहतात. जेवणाअगोदर आल्याच्या पावडरचे मिश्रण किंवा आल्याचा छोटासा तुकडा चावून खावा. आलं आणि मधाचा चहाही फायदेशिर ठरू शकतो. एक ग्लास लिंबू पाण्यामध्ये किंवा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्यास ढेकर येत नाहीत. ढेकर येत असल्यास पपई खावा. तसेच जेवणात एक वाटी दही खाल्यानेही अन्न पचवण्याय मदत होते.