• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

‘मेडिटेशन’ खरचं सोपं नाही, पण एकदा जमलं की त्याला ‘चॅलेंज’ नाही, जाणून घ्या अगदी सोप्या अन् उपयोगी टिप्स

by Sajada
September 22, 2020
in फिटनेस गुरु, योग
0
‘मेडिटेशन’ खरचं सोपं नाही, पण एकदा जमलं की त्याला ‘चॅलेंज’ नाही, जाणून घ्या अगदी सोप्या अन् उपयोगी टिप्स
2
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मन शांत राहण्यासाठी अलीकडे जो तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्यासाठी मन एका जागी राहिले पाहिजे ना ? डोळे बंद करुन ध्यान धारणेचा प्रयत्न केला तर, मनात असंख्य विषय घोळत असतात. अशाने मन शांत होण्या ऐवजी जास्तच अशांत होते. मेडिटेशन करणाऱ्या सर्वाना हा प्राथमिक अनुभव येत असतोच. कारण, मेडिटेशन हे काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्याकरता सराव आवश्यक असतो. तर आज आपण तो कसा करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.
सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मन शांत करणे. त्यात, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टीत रमलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच पेलण्यासारखे. पण सरावाने आणि सकारात्मक विचार करुन कोणीतही असाध्य गोष्ट साध्य करता येते.
१.  एकावेळी एकच काम करा.  
वेळ वाचवण्यासाठी आपण चार कामे एकवेळीच करु पाहतो. पण त्याने एकही कामाला उचित न्याय मिळत नाही. टीव्ही-जेवण, गाणी-व्यायाम, गप्पा-काम अशी अनेक चुकीची समीकरणे आपण जोडलेली आहेत. अगदी अंघोळ करतेवेळी गाणी म्हणण्यापेक्षा अंघोळीच्या वेळी अंघोळीचा आनंद आणि गाण्याच्या वेळी गाण्याचा आनंद घेण्याची सवय शरीराला लावली, तरच दोन्ही गोष्टींचा उचित आनंद घेता येईल. तसे करणे, हीच मेडिटेशनची प्रथम पायरी आहे.
२. कामावर लक्ष द्या 
ज्यावेळी आपण लहान मुलांना सांगत असतो, लक्ष देऊन अभ्यास कर. अर्थात अभ्यास करताना बाकीच्या गोष्टींचा विचार करु नको. मात्र, याच सूचनेचे पालन आपण करतो का ? नाही. अनेकदा आपण देहाने एकीकडे आणि मनाने दुसरीकडे उपस्थित असतो. तसेच होऊ न देता, हाती घेतलेल्या कामावर तन-मन केंद्रित करण्याची सवय लावली पाहिजे. मगच ध्यानधारणा आपोआप जमेल.
३. दैनंदिन आयुष्याकडे मेडिटेशन थेरेपी म्हणून पहा
मेडिटेशन हा शब्द येताच स्थिर, शांत, स्थब्ध बसलेली व्यक्ती, असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तोही मेडिटेशनचा प्रकार आहेच, पण दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टींचा भरभरून आनंद घेणे, प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेणे, शिकणे या गोष्टी मेडिटेशन थेरेपी अर्थात एखाद्या उपचाराप्रमाणे काम करतात आणि आपले मन आटोक्यात आणून ध्यानधारणेसाठी तयार करतात.
४. सकाळची वेळ निवडा 
वरील गोष्टी समजून घेतल्या असेल तर ध्यानधारणेच्या सरावास सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळी उठल्यावर, मोबाइल न पाहता शांत चित्ताने डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांची गर्दी नसते. म्हणून मन एकाग्र होते. तरी सुद्धा विचार येत असतील तर येउद्या. काहीवेळात तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यान धारणेसाठी तयार होईल.
५. ध्यान करताना संगीत लावू नका 
प्रत्येक गोष्टींमधून मन अलिप्त ठेवण्यासाठी ध्यान धारणा करण्यात येते. त्यावेळी संगीत ऐकत ध्यान धारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमून जाईल आणि गाण्या बाबत डोक्यात विचार येतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे.
यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.
त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.
तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते.
त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipschallengeeasyhealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsMeditationtipsअरोग्यअरोग्य newsअरोग्यनमाअरोग्यनमा ऑनलाईनआयुर्वेदउपयोगीचॅलेंजटिप्समेडिटेशन
Previous Post

Heart Disease Risk : ‘तांदूळ’ जास्त खाल्ल्यास होऊ शकतो ‘हृदय व रक्तवाहिन्या’संबंधी रोग

Next Post

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

Next Post
मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा 'हे' योगासन

smoking kills
माझं आराेग्य

‘धूम्रपान आणि ‘तंबाखू’चे सेवन तुम्ही तात्काळ का सोडले पाहिजे ?; जाणून घ्या कारण

by omkar
March 2, 2021
0

'धूम्रपान आणि 'तंबाखू'चे सेवन तुम्ही तात्काळ का सोडले पाहिजे ? आरोग्यनामा ऑनलाईन- धूम्रपान (Smoking) आणि तंबाखू चे सेवन करणारे जवळजवळ...

Read more
diet

इम्यून सिस्टम डॅमेज करतात ‘ही’ खास डाएट, संशोधकांनी केले सावध

March 1, 2021
Hair Care

Hair Care Tips : केसांना मजबूत आणि दाट बनवण्यासाठी घरीच बनवा खोबरेल तेल, चंपी करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

March 1, 2021
Weight Loss

Weight Loss : जपानचे लोक ‘या’ ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधीही वाढत नाही ‘लठ्ठपणा’

March 1, 2021
Fitness

Fitness Tips : फिट आणि आरोग्यदायी राहण्यासाठी लावा ‘या’ 12 सवयी, जाणून घ्या

March 1, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.