आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याकडे लग्न समारंभ किंवा कुठल्याही धार्मिक पूजाविधीसाठी मेहंदी लावण्याची प्रथा आहे. मेंदी हा शरीर किंवा हाता-पायाचं सौंदर्य खुलवण्याचा एक प्रकारच समजला जातो. अगदी पूर्वी मेंदीच्या झाडाची पानं सुकवून त्याची पेस्ट करून हाताला लावली जायची. त्यामुळे ही मेहंदी केवळ सौंदर्यच नाही तर आरोग्यही खुलवते.
मेहंदीचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :
१) गरमी किंवा पित्ताने डोके दुखत असल्यास 25 ग्रॅम मेहंदीची पाने 50 ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून हे तेल डोक्याला लावावे. किंवा 10 ग्रॅम मेहंदीची फुले 100 ग्रॅम पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने लाभ होतो. त्यामुळे मेहंदी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
२) उष्णतेमुळे किंवा अति गोड पदार्थ खाल्यामुळे अनेकांचे तोंड येते. त्यासाठी 10 ग्रॅम मेहंदीची पाने , 200 ग्रॅम पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्या. त्यामुळे तुमच्या तोंडातील फोड किंवा लालसर पणा कमी होतो.
३) घशाला सूज येते त्यावेळी आपण मिठाच्या पाण्याचा गुळण्या करतो. तसेच घसा दुखत असेल तर मेहंदीच्या पानांच्या काढयाने गुळण्या कराव्या.यानेही घशाची सूज कमी होते.
४) मेहंदीच्या पानांमध्ये tanin व wason नावाचे मुख्य रंजक द्रव्य असते. या व्यतिरिक्त galic asid सारखी द्रव्ये पण असतात. व बियांपासून तेल पण प्राप्त होते. त्यामुळे मेहंदी केवळ सौंदर्य खुलवण्यासाठीच नाही तर इतर अनेक कारणांसाठी उपयोगात येते.