आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पिकलेली गोड-आंबट करवंदे खाण्याची मौज काही निराळीच असते. परंतु, अनेकजण हे फळ कधीच खात नाहीत. रानातील झुडपात सापडणारी करंवदे आदीवासी बांधव विक्रिसाठी बाजारात आणतात. करवंदाचे चटणी, सरबत, लोणचे, मोरंबा आदी पदार्थ बनविता येतात. महाराष्ट्रातील पश्चिम घाट व कोकणात करवंदे मोठ्याप्रमाणात मिळतात. उन्हाळ्यात ही फळे खाण्यास मिळत असली तरी याचे लोणचे, मोरंबा बनवून ठेवल्यास वर्षभर तुम्ही याची चव चाखू शकता. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे असून ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.
२ करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो.
३ यातील फायबरमुळे पोट साफ होते.
४ यातील सायट्रिक अँसिडमुळे उष्णतेचे आजार बरे होतात.
५ शारीरिक ताकद वाढते.
६ यातील क जीवनसत्त्वामुळे त्वचाविकारावर उपयुक्त आहे.
७ याच्या चुर्णाने मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.
Visit : arogyanama.com