राज्यात ‘MBBS’च्या जागा वाढणार
आरोग्यनामा ऑनलाइन – राज्यात एमबीबीएसच्या जागा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर राज्यात एकूण ३,६७० जागा वाढवण्यास केंद्र सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे. यामुळे एमबीबीएमचे शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
तसेच राज्यात ७ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत. दिल्लीत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यात याबाबत सविस्तर चर्चा झाली. डॉक्टरांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील शासकीय आणि खासगी महाविद्यालयात एमबीबीएसच्या एकूण ३,६७० वाढीव जागा उलपब्ध करण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २,०२० तर सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय समाजासाठी १,६५० जागा वाढवण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, नंदूरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक, बुलडाणा येथे ७ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे.
कर्करोगामध्ये यापुढे महाराष्ट्र नॅशनल कॅन्सर ग्रीड, व्हच्र्युअल ट्युमर बोर्ड, कॅन्सर फेलोशिप असे अनेक कार्यक्रम राबवले असल्याने जळगावमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली. नागपुरात रिजनल इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल सायन्स सुरू करण्यास मंजुरी केंद्राने मंजुरी दिली आहे. पुणे आणि मिरज येथे विशेष पॅरामेडिकल सेंटर स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे Sickle Cells Hemoglobionopathy ICMR द्वारा सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे.