एरोबिक्सनंतर आता ‘मसाला भांगडा’ डान्स एक्झरसाइजची वाढतेय ‘क्रेझ’

July 4, 2019

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डान्स एक्झरसाइजमध्ये एरोबिक्स सर्वात लोकप्रिय ठरले असले तरी आता मसाला भांगडा व्यायामाचीही क्रेझ वाढत आहे. ढोलच्या बीट्सवर थिरकण्यात तरूणाईला आवडते. भारतीयांना ढोलचा नाद आवडत असल्यामुळे ही संकल्पना मांडण्यात आली होती. या व्यायामामध्ये देशी भांगड्याच्या स्टेप्स भरपूर ऊर्जेसह केल्या जातात. हा एक चांगला कार्डिओव्हेस्क्यूलर व्यायाम आहे.

व्यायाम करण्याची पद्धती –

हा व्यायाम आठवड्यातील सातही दिवस करता येतो. वेळेचा अभाव असेल तर आठवड्यातून दोन-तीन दिवस करावा. वजन कमी करण्यासाठी हा व्यायाम आठवड्यातून सहा दिवस करावा. सर्व वयोगटातील लोक हा व्यायाम करू शकतात. ज्येष्ठांसाठीही यामध्ये वेगळ्या स्टेप्स देण्यात आल्या आहेत. गरजेनुसार यामधील नृत्य हालचालींमध्ये बदल करण्यात येतो. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला नृत्य येणे गरजेचे नाही.

फायदे –
मसाला भांगडा हृदयासाठी फायदेशीर असून यामुळे कमरेच्या वरच्या भागाला बळ मिळते. तसेच मांड्या आणि पायांचादेखील चांगला व्यायाम होतो. पाठ आणि पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि पॉश्चरही चांगला राहतो.