डोळ्याच्या इंफेक्शन पासून ते पोटाच्या अनेक समस्यांवर गुणकारी ‘झेंडूचे फूल’
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – झेंडूचे फुल प्रत्येक समारंभात सजावटीसाठी अवश वापरले जाते . तर देवपूजेमधेही झेंडूच्या फुलाचा समावेश असतोच. पण अशाच या झेंडूचे औषधी गुणधर्म माहित आहेत का तुम्हाला ? झेंडूच्या फुलामध्ये आणि त्याच्या पानामध्ये ऍन्टी बायोटिक, ऍन्टीफंगल आणि अनेक औषधी गुणधर्मांचा समावेश असतो.
– ऍन्टी इंफ्लेमेंट्री हा गुण झेंडूच्या फुलामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. शरीराव आलेला सूज आणि जखम दूर करण्यासाठी हा गुणधर्म लाभदायक असतो. जखम झालेल्या ठिकाणी झेंडूच्या फुलांचा लेप लावल्याने जखम लवकर कमी होते.
– झेंडूच्या फुलामध्ये ऍन्टी माइक्रोबियल आणि ऍन्टी इंफ्लेमेंट्री गुण शरीराला बैक्टीरिया पासून दूर ठेवतात. म्हणूनच मुरुमांवर याचा लेप लावल्याने मुरूम लवकर कमी होतात. गुलाब पाणी मध्ये याचा लेप मिळवून मुरुमांवर लावावा.
– ऍन्टी बैक्टीरियल हा गुणधर्म झेंडूच्या फुलात असल्याने याचा चहा बनवून पिल्याने शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी- खोकला आणि ताप अशा आजारांवरही एक उत्तम औषध म्हणून झेंडूच्या फुलाचा वापर करू शकता.
– दात घासतानाही झेंडूच्या फुलाचा वापर केल्याने हिरड्याना सूज येणे आणि दातातून रक्त येणासारख्या गोष्टींवर एक चांगला औषध म्हणून लावू शकता.
– झेंडूचे फुला तुपात मिसळून डोळ्यांमध्ये लावल्याने डोळ्यातून पाणी येणे आणि डोण्यात जळ जळ होण्यासारखे प्रकार कमी होता.
– झेंडूच्या फुलाचा रस मधात मिसळून याचा सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते.