कोलकत्यात झालेल्या डॉक्टरांवरील हल्याचा महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून तीव्र निषेध

मुंबई वृत्तसंस्था : कोलकत्यात झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला आहे. (MARD) महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना आणि (ASMI) इंटर्न डॉक्टरांची संघटना यांनी savethedoctor हि मोहीम सुरु केली आहे.एवढेच नाही तर या संघटनांनी प्रसिद्धी पत्रक काढून आम्ही या डॉक्टरांसोबत आहोत असे सांगून या संघटना तीव्र स्वरूपात निषेध करत आहे.

सरकार सध्या खूप मोठया प्रमाणावर आरोग्य योजना राबवत आहे. पण आम्ही लोकांची सेवा करतो. तर आम्हाला चांगली सुरक्षा दिली जात नाही.असा आरोप या डॉक्टरांनी केला आहे.आमचा सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे. मात्र याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. अशा शब्दात डॉक्टरांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान आमच्या सुरक्षेसाठी आम्ही सरकारचे वारंवार दार ठोठावूनही सरकारने आमच्या सुरक्षेकडे लक्ष दिले नाही. सरकार आता काय आमचा कायदा हातात घेण्याची वाट पाहते आहे का? असा प्रश्न या संबंधित डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. सरकारने राज्यातील रुग्णालयातील डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी. आणि पोलिसांनी या झालेल्या प्रकरणाची कसून चौकशी करावी. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा धमकी वजा इशारा या संबंधित डॉक्टरांनी सरकारला दिला आहे.