आरोग्यानामा ऑनलाईन टीम : लवंग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ती अनेक व्याधी आणि विकारांवर गुणकारी आहे. यातील अॅन्टी-ऑक्सिडंट आणि अॅन्टी-बॅक्टेरियल तत्वे आरोग्य सुदृढ बनवण्याचे काम करतात. ती नैसर्गिकरित्या गरम असल्याने सर्दी खोकल्यावर फायदेशीर आहे. लवंगेचे उपाय जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
१ सायनस
लवंगेचा आहारामध्ये समावेश केल्यास सायनस आणि नाकाच्या इतर तक्रारींपासून आराम मिळतो.
२ चेहऱ्यावरील पुरळ
चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ दूर करण्यासाठी लवंगाच्या तेलाचा उपयोग होतो.
३ पचनक्रीया सुधारते
पचनक्रिया सुधारते. गॅस, जळजळ, अपचन आणि उलट्या होणे यांसारख्या तक्रारींवर गुणकारी आहे.
४ दातदुखीवर फायदेशीर
एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा.
५ तोंडाची दुर्गँधी
लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंधी दूर होते.
६ सांधेदुखीवर
लवंगाचे तेले साध्यांवर लावल्याने सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.
Visit : arogyanama.com