आरोग्यनामा ऑनलाइन टीम : अनेकदा सामान्य वाटणारे आजार हे मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात. त्यामुळे अशा छोट्या आजारांकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. अनेक दुर्लक्ष केल्याने मोठे आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे किरकोळ वाटणारे त्रास नंतर तापदायक ठरतात. असे काणते किरकोळ त्रास आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
घोरण्याची सवय अनेकांना असते. शिवाय याकडे कुणीही गांभिर्याने पहात नाही. ही एक सामान्य सवय आहे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, यामुळे स्लीप एप्निया, हृदयविकार, नैराश्य, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात. मानसिक ताण हा देखील पुढे त्रासदायक ठरू शकतो. कामासंबंधित ताण वाढून नैराश्य वाढते आणि त्यातून हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.यूरिनच्या तक्रारीकडेही कधी दुर्लक्ष करू नये. ही समस्या आपोआप बरी होईल म्हणून अनेकजण दुर्लक्ष करतात. लघवीला जळजळ, लघवीला वारंवार होणे, त्रास होणे हे मधुमेह, किडनी किंवा लिव्हरच्या आजारांचे संकेत असू शकतात. त्यामुळे असे त्रास असतील तर वेळीच डॉक्टरांकडे गेले पाहिजे. तोंडाची दुर्गंधी येणे हा देखील मोठ्या आजाराचा संकेत असू शकतो. तोंडाची स्वच्छता न ठेवण्यासोबतच हे मधुमेह, यकृत किंवा किडनी खराब असण्याचा संकेत असू शकतात. तर सतत पाठदुखी होणे हे मूतखड्याचे कारण असू शकते.
शरीरात कमजोरी, थकवा जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. कारण आयर्नची कमतरता, हृदयविकार, थायरॉइड यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी हा सामान्य त्रास वाटत असला तरी तो एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.शरीरात पाण्याच्या कमतरते व्यतिरिक्त हृदय आणि मेंदूसंबंधी आजाराचे ते संकेत असू शकतात. खांद्याच्या वेदना होणे हे गंभीर लक्षण आहे. कमजोरी, थकवा,श्वास घेण्यात अडचण यासोबतच हृदयविकाराचा हा संकेत असू शकतो.शिवाय त्वचेला खाज येत असल्यास हा देखील गांभिर्याने घेण्यासारखा संकेत आहे. त्वचारोगाबरोबरच लिव्हर डिसिज, किडनीचा आजार किंवा डायबिटीजचे कारण असू शकते. तर लूज मोशन, मोशनमध्ये बदल, बद्धकोष्ठता, पोट फुगण्याची समस्या हे कँसरसारख्या आजाराचे कारण असू शकते.