आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुषांनी काही आजारांना किरकोळ न समजता त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. कारण सामान्य वाटणारे आजार हे मोठ्या आजारांचे संकेत असू शकतात. यासाठी कोणत्या संकेतांकडे गांभीर्याने पहावे, याबाबत माहिती घेवूयात.
हे आहेत संकेत आणि आजार
खांद्याच्या वेदना
कमजोरी, थकवा, श्वास घेण्यात अडचण यासोबतच हृदयविकाराचा संकेत असू शकतो.
खाज
त्वचारोग, लिव्हर डिसिज, किडनीचा आजार किंवा डायबिटीजचा संकेत असू शकतो.
जुलाब
लूज मोशन, मोशनमध्ये बदल, बद्धकोष्ठता, पोट फुगण्याची समस्या हे कँसरसारख्या आजाराचे कारण असू शकते.
तोंडाची दुर्गंधी
तोंडाची स्वच्छता न ठेवण्यासोबतच हे मधुमेह, यकृत किंवा किडनी खराब असण्याचा संकेत असू शकते.
पाठदुखी
सतत पाठदुखी होणे हे मूतखड्याचे कारण असू शकते.
कमजोरी, थकवा
यामागे आयरनची कमतरता, हृदयविकार, थायरॉइड प्रॉब्लेम सारखी कारणे असू शकतात.
डोकेदुखी
शरीरात पाण्याच्या कमतरते व्यतिरिक्त हृदय आणि मेंदूसंबंधी आजार असू शकतो.
घोरणे
यामुळे स्लीप एप्निया, हृदयविकार, नैराश्य, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात.
ताण
कामासंबंधित ताण वाढून नैराश्य वाढते आणि त्यातून हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
यूरिनच्या तक्रारी
लघवीला जळजळ, ती वारंवार येण्याची समस्यो, त्रास होणे हे मधुमेह, किडनी किंवा लिव्हरच्या आजारांचा संकेत असू शकते.