आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दोन मुलांची आई असलेली बॉलिवुडची अभिनेत्री मलाइका अरोडाची फिगर आणि सौंदर्य आजही तसेच आहे. मलाइका फिगर मेंटेन करण्यासाठी नेहमी दक्ष असते. आपले आरोग्य, फिगर आणि सौंदर्य जपण्यासाठी मलाइका कोणती काळजी घेते, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
ती अशी घेते काळजी
१) मलाइका कोणताही विशेष डायट फॉलो करत नाही. आहार नेहमी पौष्टिक असावा असे ती मानते.
२) ती सकाळी लिंबू आणि मधासोबत एक ग्लास कोमट पाणी पिते.
३) नाश्त्यामध्ये ऋतूमानानुसारच्या फळांसोबत इडली, उपमा, पोहा आदी घेते.
४) दुपारी बारा आवळ्यांसोबत एक ग्लास व्हेजिटेबल ज्यूस आणि ब्राऊन टोस्टसोबत एका अंड्यातील पांढऱ्या बलकाचे आमलेट खाते.
५) रात्रीच्या जेवनात ब्राउन किंवा राइस, २ ते ३ प्रकारचे व्हेजिटेबल, चिकन किंवा फिश आणि सलाद सेवन करते.
६) रात्रीच्या जेवनानंतर कधी भूक लागलीच तर १ संत्री, गाजर किंवा अन्य फळ किंवा अंजीर, बदाम आदी खाते.
७) आठवड्यातून किमान तीन दिवस दिड तास जिममध्ये वर्क आऊट करते.