आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मेकअपमध्ये डोळे किंवा ओठ यांना जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व भुवयांनासुद्धा आहे. कारण ठळक भुवयांमुळेच चेहरा रेखीव आणि उठावदार दिसतो. खूप कमी मुलींच्या भुवयांची ठेवण ही अनुरूप असते. पण ज्यांच्या भुवया विरळ किंवा दाट आहेत, त्यासुद्धा मेक अपद्वारे सुबक बनवू शकतात. मेक-अप करण्याआधीचे सर्वात पहिले महत्त्वाचे काम म्हणजे भुवईला योग्य आकार देणे. तुम्हाला जर तुमच्या भुवयांना योग्य आकार द्यायचा असेल तर खालील टिप्स फॉलो करा.
१) क्लीअर जेल :
क्लीअर जेलचा वापर भुवईचे केस एका जागी स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. ज्यांच्या भुवया दाट आहेत व केसही लांब आहेत त्यांनी क्लीअर जेल अप्लाय करावे.
२) टिन्टेड जेल :
क्लीअर जेलप्रमाणेच टिन्टेड जेलचा उपयोग आहे पण टिन्टेड जेल हे सौम्य असून पातळ, विरळ भुवयांना उपयुक्त आहे. पावडर स्वरूपातील प्रॉडक्ट्स लावले तर ते एका जागी टिकून राहण्याकरिता टिन्टेड जेल लावावे.
३) पेन्सिल :
सर्वात प्रचलित असलेले व लावण्यासही अत्यंत सोपे असे भुवयांचे मेक-अप प्रॉडक्ट म्हणजे आयब्रो पेन्सिल. तिरका कट असलेली पेन्सिल भुवया दाट दिसाव्यात म्हणून वापरतात. पेन्सिलचा रंग निवडताना भुवयांना मॅच होईल तोच रंग निवडा नाही. पेन्सिल हलक्या हाताने फिरवल्यानंतर ब्रो ब्रशने भुवयांमध्ये रंग ब्लेंड करावा.
४) पावडर :
प्रेस्ड पावडर आय शॅडो किंवा आयब्रो पावडर भुवयांच्या डिटेल्ड मेक-अपसाठी वापरतात. पेन्सिलप्रमाणेच पावडरच्याही शेड बाजारात उपलब्ध आहेत.
५) वॅक्स :
जेलप्रमाणेच याचाही उपयोग भुवईचे केस एका जागी स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. वॅक्स हे लाँग लास्टिंग इफेक्ट देते.