आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे बऱ्याच समस्या उद्भवतात. यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुरळ दिसून येतात. आपल्याला ही समस्या असेल तर आपण घरगुती फेसपॅक बनवू शकता.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
१) मुलतानी मातीपासून बनवलेले फेसपॅक-
मुलतानी माती आणि गुलाबपाणी हे त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात. यासाठी दोन्ही समप्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून १५ ते २० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.मुलतानी माती चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करते व तसेच त्वचेला मऊ करते.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
२) बेसन आणि काकडीपासून तयार केलेले फेसपॅक-
काकडीचा रस हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा ताजी ठेवण्यासाठी एक चमचा काकडीचा रसात चिमूटभर हळद आणि बेसन पीठ मिसळा. बेसन पिठाचा वापर आपण अनेक काळापासून करत आलो आहोत. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करून चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यास मदत करते.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
३) अंड्यातील पांढरा भाग आणि मध यापासून तयार केलेला फेसपॅक-
अंड्यातील पांढरा भाग घेऊन त्यात एक चमचा मध घाला आणि दहा मिनिटे तसेच सोडा. अंड्यातील पांढरा भाग व्हाइट आणि ब्लॅकहेड्स कमी करून त्वचा चमकदार करण्यासाठी फायदेशीर आहे. मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात हे त्वचेला मॉइस्चराइझ करण्यात उपयुक्त आहे.
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
४) फळांपासून तयार केलेला फेसपॅक-
चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी पपई आणि स्ट्रॉबेरी बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा.आणि हे पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून चेहरा धुवून टाका.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
५) दहीपासून बनवलेले फेसपॅक-
मोठा चमचा दही घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून घ्या आणि ते मिश्रण चेहर्यावर लावा. ३० मिनिटांनंतर हे मिश्रण धुवून टाका. त्यात साइट्रिक ॲसिड, एक्सफोलीएटिंग गुणधर्म आणि प्रोबियटिक्स आहेत जे त्वचा मऊ आणि तेल मुक्त ठेवण्यास मदत करतात.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय