आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुम्हाला जर तुमच्या पाठीच्या त्वचेचा रंग उजळायचा असेल तर जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण काही साधे आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पाठीची त्वचा सुंदर करू शकता. यासाठी तुम्हला जास्त वेळ आणि खर्च करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुमच्या पाठीच्या सुंदरतेसाठी खालील काही घरगुती उपाय करा आणि तुमची तुमची त्वचा सुंदर बनवा.
१) तुमच्या पाठीच्या सुंदरतेसाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या. ती पेस्ट २० मिनिटे पाठीवर लावल्याने पाठीचा रंग उजळण्यास मदत होईल.
२) पाठीला जर सुंदर बनवायचे असेल तर आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून त्याची पेस्ट तयार करावी. ती पेस्ट पाठीवर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली पाठीची त्वचा उजळेल आणि पाठ साफ होईल.
३) तसेच साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून पाठीवर स्क्रब करा. त्याने पाठीवरील डेड स्किन निघून जाईल.
४) उन्हामुळे जर तुमची पाठ काळवंडली असेल तर तुम्ही नारळाचे पाणी पाठीवर लावा. यामुळे तुमची पाठ उजळण्यास मदत होईल.
५) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून ती पाठीवर लावा. नंतर पाठ धुवून घ्या. यामुळे तुमची पाठ गोरी आणि मऊ होईल.