आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जिमला न जाताही काही खास उपाय करून, घरीच मेहनत करून आणि योग्य आहार घेऊन पिळदार शरीर बनवता येऊ शकते. घरच्याघरी मसल्स बनवण्यासाठी कोणते खास उपाय करावेत, याविषयी खास माहिती आपण घेणार आहोत.
पुश-अप्स
घरच्याघरी प्रथम थोड वार्म-अप करून नंतर पुश-अप्स करा. सरळ पोटावर झोपा. झोपल्यानंतर दोन्ही हातांच्या आधारे शरीर वर घ्या. नंतर पुन्हा खाली घ्या. असे वर खाली किमान २५ ते ३० वेळेस करा.
लेग ड्रॉप
लेग ड्राप करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही पाय हळुहळु वर उचलून सरळ करा. या स्थितीत थोडावेळ थांबा. नंतर पाय खाली घेऊन ४५ डिग्रीचा कोन बनवून पुन्हा थांबा. ८ ते १० वेळा असे करा.
क्रंचेस
जमिनीवर सरळ झोपा. दोन्ही हात कानाच्या मागे घ्या. पाय गुडघ्यापासून वाकवून डोके आणि पाठ वर उचला. पुन्हा त्याच स्थितीत या. २५ ते ३० वेळा असे करावे.
साइड प्लॅँक
एका कुशीवर झोपून शरीराला एक हात आणि दोन्ही पायांच्या साह्याने वर उचला. ३० सेकंद असे रहा. पोट आणि मांड्या ताणून ठेवा. किमान ८ ते १० वेळेस असे करा.
कात्री
पाठीवर झोपून दोन्ही पाय वर उचला. हळुहळु डावा पाय खाली घेऊन सरळ करा. उजवा पाय खाली घेऊन डावा पाय वर उचलावा. किमान ८ ते १० वेळेस असे करा.
स्क्वॅट्स
सरळ उभे राहून दोन्ही हात सरळ रेषेत ठेवा. गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारखे करा. श्वास सोडून पुन्हा वर या. ही क्रिया किमान १० ते १५ वेळा करा.
वॉकिंग, रनिंग
कमीत कमी ३० मिनिटे वॉकिंग आणि रनिंग नियमित करा.
Visit : arogyanama.com