आरोग्यनामा ऑनलाईन- गणेशोत्सवात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. अनेकांना मोदक खायला खूप आवडतं. उत्सवा व्यतिरीक्त तुम्ही इतर दिवशीही मोदक बनवू शकता. काही लोक चॉकलेटचे(chocolate) खूपच शौकीन असतात. जर मोदक आणि चॉकलेट या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर? म्हणजेच जर तुम्हाला चॉकलेटचे मोदक खायला मिळाले तर? होय आज आपण चॉकलेटचे(chocolate) मोदक कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य –
– पाव कप खवा (करोडा करून घेतलेला)
– पाव कप पिठीसाखर
– दीड ते दोन चमचे कोको पावडर
कृती –
– कोरड्या केलेल्या खव्यात पिठीसाखर एकत्र करा.
– एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला आणि एकत्र करा.
– पुन्हा एक चमचा कोको पावडर घाला आणि एकत्र करा.
– जोवर मिश्रण घट्ट होत नाही तोवर त्यात कोको पावडर घाला.
– जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल तेव्हा त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या आणि मोदक तयार करून घ्या.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.