घरगुती बनवा स्क्रब, जाणून घ्या फायदे…

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुम्ही नेहमी आपल्या चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपाय करत असतात. सगळ्या मुलींना वाटत असते  की, आपण नेहमी सुंदर दिसावे त्याचबरोबर तुम्हाला कमी पैशात सुंदर दिसायचे असते. अशावेळी तुम्ही घरगुती स्क्रब तयार करुन ते चेहऱ्यावर लावू शकता. हे घरगुती स्क्रब कसे तयार करायचे याची सविस्तर माहिती जाणून घ्या..

फळांपासून बनवा स्क्रब

१. संत्रीचे स्क्रब
थंडीमध्ये संत्रीचा सीजन असतो. त्यावेळी संत्रीचा स्क्रब तुम्ही बनवू शकता. संत्रीमध्ये विटामिन सी असते. त्यामुळे याचा वासही छान येतो आणि हे आपल्या स्किनला फ्रेश ठेवतो. कसे बनवाल हे स्क्रब ? 2 संत्र्याचा ज्यूसमध्ये ओट्स टाकून पेस्ट बनवा. आता तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ करा. याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २ किंवा ३ मिनिटाने चेहरा धुवून टाका. थंडीमध्ये हा परफेक्ट स्क्रब आहे.

२. टरबूजचा स्क्रब
उन्हाळ्यामध्ये टरबूज हे आपल्या शरीरीला थंड करण्याचे काम करते.  गर्मीमध्ये आपला चेहरा खूपच खराब होतो अशावेळी टरबूजने चेहरा स्क्रब केल्याने चेहरा खुलून दिसतो. कसे तयार कराल हे स्क्रब ? एक टरबूजचा ज्यूस करा. त्यामध्ये २ चमचे बेसन टाका. आता याने चेहऱ्यावर मसाज करा आणि २ ते ३ मिनिटाने चेहरा धुवून घ्या. यामुळे चेहरा प्रसन्न दिसेल.

३. पपई स्क्रब
पपई असे फळ आहे जे आपल्या भारतात नेहमी उपलब्ध असते. पपई चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. पपईचे साल आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयोगी आहे. याने चेहऱ्याचा कलर उजळतो. असे बनवा याचे स्क्रब. १ पपईचा बारीक तुकडा घ्या त्यामध्ये १ चमचा साखर आणि १ चमचा ओट्स मिसळा. याला चेहऱ्यावर आणि मसाज करा. याने चेहऱ्यावरचे निर्जिव सेल्स निघून जातात. हे स्क्रब २ मिनिटे ठेवून चेहरा धुवून घ्या.

४. लिंबू स्क्रब
लिंबू हा प्रत्येकाच्या घरात असतोच. त्यामुळे आपण याचे स्क्रब त्वरित बनवू शकतो. १ चमचा लिंबूचा रस घ्या. त्यामध्ये १ चमचा मध दीड चमचा साखर मिसळा. याचे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावून मसाज करा. मसाज केल्याने हळूहळू साखर विरघळते. हा खूप सोपा आणि लवकर तयार होणारा स्क्रब आहे. याने चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात आणि चेहरा उजळतो.

५. केळाचे स्क्रब
केळाचे दोन पिस घ्या  त्यामध्ये मध आणि ओट्स टाका याचे मिश्रण करा. याने चेहऱ्यावर मसाज करा आणि चेहरा १० मिनिटाने धुवून टाका. याने तुमच्या चेहऱ्यावर कोणते नुकसान होणार नाही आणि याने कोणती एलर्जी देखील होणार नाही.

६. टोमॅटो स्क्रब
टोमॅटोचे पल्पमध्ये साखर मिसळून त्याचे मिश्रण करा हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा.

महत्वाची सूचना
लक्षात ठेवा आठवड्यातून २ वेळाच चेहऱ्याला स्क्रब करा.
स्क्रब करण्याआधी चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
स्क्रब ३ ते ४ मिनिटापेक्षा जास्त वेळ करु नका.
स्क्रब केल्यानंतर moisturizer जरुर लावा.