तुमच्या केसांच्या प्रकारानुसार बनवा घरगुती ‘हेयर सीरम’, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आकर्षक केसांसाठी त्यांचं निरोगी असणं फार महत्वाचं आहे. केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढीसाठी हेयर सीरम वापरतात. तुमच्या डोक्याच्या त्वचेनुसार आणि केसांच्या प्रकारानुसार सीरम तयार करू शकता. जाणून घ्या वेगवेगळ्या तेलांचा वापर करून घरगुती हेयर सीरम कसे तयार करावे.
ड्राय केसांसाठी सीरम
डोक्याची त्वचा कोरडी असेल तर बदामाचं तेल, ऑर्गन तेल आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून हेयर सीरम तयार करा. हे सीरम केसांच्या मुळांना लावून मसाज करा. त्यांनतर गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून त्यातील पाणी काढून घ्या आणि केसांना वाफ द्या.
ऑयली केसांसाठी सीरम
दोन चमचे अॅलोवेरा जेल, एकचमचे बेकिंग सोडा, दोन चमचे गुलाब पाण्यासोबत एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. हे सीरम केसांच्या मुळांना लावून मसाज करा. त्यांनतर १० मिनिटांनी केस धुवून टाका.
नॉर्मल केसांसाठी
या वर्गात मोडणारे केस जास्त तेलकट किंवा कोरडेही नसतात. नॉर्मल केसांना मध आणि एक चमचा बदामाचं तेल एकत्र करून ३० मिनिटांसाठी केसांना लावा. त्यानंतर केस धुवून टाका.