आरोग्यनामा ऑनलाईन- तुम्ही कचोरी तर अनेकदा खाल्ली असेल. पंरतु पोह्यांची कचोरी कधी खाल्ली आहे का ? नक्कीच नसेल खाल्ली. आज आपण पोह्याच्या कचोरीची खास रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य –
– पातळ पोहे 2 वाट्या.
– मीठ चवीनुसार
– तेल 2 चमचे
– आलं-लसूण पेस्ट 1 चमचा
– बडीशेप अर्धा चमचा
– धने-जिरे पावडर 1 चमचा
– हळद
– तिखट चवीनुसार
– आमचूर पावडर अर्धा चमचा
– बेसन अर्धी वाटी
– मीठ आणि साखर चवीनुसार
– कोथिंबीर 4 चमचे
– तेल अर्धी वाटी
कृती –
– 2 वाट्या पातळ पोहे भिजवून त्याचं पाणी काढून टाका. आता ते चांगले मळून त्यात चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घालून बाजूला ठेवा.
– दुसऱ्या पॅनमध्ये 2 चमचे तेलात 1 चमचा आलं लसून पेस्ट परतून घ्या. त्यात अर्धा चमचा बडीशेप, धने-जिरे पावडर, हळद, तिखट, आमचूर पावडर घालून मसाला परतून घ्या.
– नंतर यात अर्धी वाटी बेसन चवीनुसार मीठ, साखर घालून मिश्रण एकत्र करा.
– नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाण्याचा हबका मारून झाकण लावून शिजू द्या. भिजवलेल्या पोह्याचा एक गोळा तोडून त्याची लाटी तयार करा.
– मधोमध मसाला भरून चारही बाजूनं बंद करून दोन्ही हातांनी दाबून चपटे करा.
– तळण्यापूर्वी तेल मध्यम गरम करून त्यात तयार वाट्यांना मधोमध दाबून वाटीसारखा आकार द्या.
– मंद आचेवर तळून घ्या.
– आता तुमची गरमाम गरम पोह्यांची कचोरी खाण्यासाठी तयार आहे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.