आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदलेल्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. अनेकदा ताणाचा विपरित परिणाम शरिरावर होत असतो. हा परिणाम टाळण्यासाठी काही सोपे उपाय करता येऊ शकतात. यामुळे मानसिक ताण कमी होऊ शकतो. तणाव जाणवत असल्यास जवळच्या मित्राला फोन केल्यास चांगला फरक पडतो. मनात चाललेल्या गोष्टी मित्रासोबत शेअर केल्याने तणाव कमी होतो.
असे उपाय
* एखाद्याकामाचे व्यवस्थित नियोजन करावे. यामुळे अचानक आणि अनावश्यक येणाऱ्या तणावापासून सुटका होते.
* शरीरात व्हिटॅमिन्स डीची कमतरता असल्यास तणावाचा सामना करावा लागतो. यासाठी आहारात व्हिटॅमिन्स डी युक्त पदार्थांचा समावेश करावा.