आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जीममध्ये जाऊन आपण शरीर पिळदार करू शकतो. यामुळे भरपूर ताकद येते. परंतु, मेंदु कार्यक्षम राहण्यासाठी मेंदुलाही व्यायाम आवश्यक असतो. मेंदुचा व्यायाम कसा करावा, हे आपण येथे जाणून घेणार आहोत. मेंदू कार्यक्षम राहण्यासाठी आणि विचारात व्यापकता येण्यासाठी जिज्ञासू वृत्ती आवश्यक असते. अशाच काही सवयींची माहिती आपण घेणार आहोत.
मेंदुचा व्यायाम
खेळ खेळल्याने मेंदु निरोगी राहतो. खेळामुळे मेंदूला आव्हान मिळते. सुडोकू आणि बुद्धीबळसारख्या खेळांमुळे वेगाने विचार करण्याची क्षमता वाढते. रोज केवळ १५ ते २० मिनिटे असे गेम खेळावे. हा मेंदुसाठी एकप्रकारचा व्यायाम आहे.
ध्यान करा
नियमित ध्यान धारणा केल्याने बौद्धीकदृष्ट्या व्यक्ती निरोगी राहातो. शारीरिक आरोग्य चांगले राहते. तसेच झोपही चांगली येते.
योग्य आहार
बुद्धीसाठी योग्य आहार सुद्धा खुप आवश्यक आहे. आहारात ऑलिव्ह ऑइल व मासे यांचा समावेश केला पाहिजे.
गोष्टींचे वाचन
मित्रांना आपले अनुभव सांगा, यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते. गोष्टी वाचण्याच्या सवयीमुळे मानसिक सुदृढता येते. वाचलेल्या गोष्टी इतरांना मनोरंजक पद्धतीने सांगितल्यास स्मरणशक्ती चांगली राहते.
व्यायाम
शारीरिक व्यायामाचा बुद्धीवरही चांगला परिणाम होत असतो. यासाठी नियमित व्यायाम करावा.