फुप्फुसांचा संसर्ग ठरू शकतो घातक, वेळीच ओळखा लक्षणे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फुप्फुसांचा संसर्ग झाल्यास व तो लवकर न समजल्यास खूप घातक ठरू शकतो. फुप्फुस हा माणसाच्या शरीरातील खूप महत्त्वाचा अवयव आहे. फुप्फुसांच्या संसर्गाची लक्षणे वेळीच ओळखता न आल्यास अशावेळी परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते. फुप्फुसांच्या संसर्गाची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे.
तुम्हाला श्वास घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असतील, तर असे लक्षण दिसताच सावध व्हावे. कारण हे फुप्फुसांचा संसर्ग होण्याचे प्राथमिक लक्षण असू शकते. अशा स्थितीत ताबडतोब डॉक्टरांकडे जावून तपासणी व उपचार घेतले पाहिजेत.प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान वेगवेगळे असते. परंतु साधारणत: शरीराचे तापमान ९८.६ डिग्री एवढे असते. ताप येणे हा सुद्धा फुप्फुसाच्या संसर्गाचा संकेत असू शकतो. ज्यांना हायपोथायरॉयडीज्म आहे त्यांनी धूम्रपान आणि अल्कोहोलच्या व्यसनापासून दूर रहाणे हिताचे ठरते.
यामुळे रूग्णाची स्थिती अनियंत्रित होऊ शकते. अनेकवेळा खोकताना चांगल्यारीतीने कफ तयार न होणे किंवा खूप जास्त कफ तयार होणे ही दोन्ही लक्षणे फुप्फुसाच्या संसर्गाची असू शकतात. श्वास घेताना छातीवर दबाव, आकस आणि त्रास जाणवणे हे हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होते. तसेच ही लक्षणे फुप्फुसांच्या संसर्गामुळे झालेल्या कमकुवत कार्यप्रणालीची सुद्धा असू शकतात. कफ अधिक घट्ट किंवा पातळ असेल आणि त्याचा रंग बदलत असेल तर हा प्रकार सामान्य नसतो. असे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टर योग्य परीक्षण करून तत्काळ समस्येवर उपाय करू शकतील.