आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस (Corona Virus) सामान्यपणे रूग्णांच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या दरम्यान आपण पाहिले होते की, व्हायरसच्या हल्ल्याने अनेक रूग्णांची फुफ्फुसे 90 टक्केपर्यंत खराब झाली होती. यामुळे डॉक्टरांना ही भीती वाटत होती की या फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस (Lung Fibrosis) नावाचा आजार होऊ शकतो. सामान्यपणे आजारांमध्ये फुफ्फुसाचे टिशू खराब होतात आणि फुफ्फुसे काम करणे बंद (Lung Fibrosis) करतात. परंतु एका स्टडीत समजले आहे की, कोरोनाचे ते रूग्ण ज्यांची फुफ्फुसे खराब झाली होती ती 3 महिन्यात ठिक होत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर सुमित सिंघानिया यांनी सांगितले की, स्टडीमध्ये समजले आहे की, बहुतांश रूग्णांची फुफ्फुसे चांगली होत आहेत. या स्टडीचे सुरूवातीचे निष्कर्ष ’लंग इंडिया जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
चांगली होत आहेत खराब फुफ्फुसे
डॉक्टर सुमित सिंघानिया यांनी सांगितले की हा स्टडी कोरोनाच्या त्या रूग्णांवर केला गेला ज्यांची फुफ्फुसे खुप खराब झाली होती. त्यांनी म्हटले की, तीन महिन्यानंतर बहुतांश रूग्णांच्या फुफ्फुसाचा आकार आणि काम करण्याची पद्धत खुप चांगली झाली आहे. सर्व रूग्णांची लंग फंक्शन टेस्ट आणि सीटी स्कॅन करण्यात आले.
अशा रूग्णांवर ठेवले लक्ष
हा स्टडी कोरोनाच्या त्या 42 रूग्णांवर करण्यात आला ज्यांना अँटीव्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन आणि स्टेरॉईड देण्यात आले होते.
या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
सोबतच धोकादायक स्तरावरील निमोनिया सुद्धा झाला होता.
आतापर्यंत या स्टडीच्या अंतर्गत 300 लोकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
काही लोकांवर कोरोना झाल्यानंतर एक वर्षापर्यंत लक्ष ठेवण्यात आले.
कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना लंग फायब्रोसिसचे औषध सुद्धा घेण्यास सांगण्यात आले आहे.
Web Title :- Lung Fibrosis | coronavirus hit lungs heal in 3 months says study
Bad Habits | ‘या’ 10 सवयी रहस्यमय पद्धतीने तुम्हाला घेऊन जात आहेत मृत्यूकडे, लवकर सोडा
Raisin Water | जाणून घ्या मनुकाच्या पाण्याचे काही फायदे
Sleeping Problem | आपली झोप मोड होते का? तर ‘हे’ 7 छोटे उपाय आपल्याला मदत करतील, जाणून घ्या
Oil Massage | केसांना तेलाची मालिश करण्याचा योग्य मार्ग अन् वेळ काय असावी; जाणून घ्या