आरोग्यनामा ऑनलाइन टीम : अंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी सर्व विधानसभा मतदार संघात योगासने करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजधानी लखनऊमधील राजभवनात योग दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहे. येथील भाजप प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराज आणि उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा हे सुद्धा राजभवनातील कार्यक्रमात योगी यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशातील सर्व मंत्री, प्रदेश पदाधिकारी, विविध आयोग, महामंडळांचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी व वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.तसेच भाजपचे आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित कार्यक्रमात योगा करणार आहेत.
भाजपचे उत्तर प्रदेश महामंत्री विद्यासागर सोनकर व प्रदेश मंत्री अनूप गुप्ता यांनी यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जनरल वी के सिंह गाजियाबद, राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही हे ललितापूर, स्वामी प्रसाद मौर्य बदायू, दारासिंह चौहान बाराबांकी, धर्मपाल सिंह गोरखपूर, रमापति शास्त्री उन्नाव, ब्रजेश पाठक सतीपूर, चौधरी लक्ष्मी नारायण शाहजहांपूर, चेतन चौहाण फरूखाबद, श्रीकांत शर्मा बिजनौर, राजेंद्र सिंह मोती कुशीनगर, सिद्धार्थनाथ सिंह मेरठ, मुकुट बिहारी वर्मा पीलीभीत, नंदगोपाल गुप्ता नंदी रायबरेली, सतीश महाना कानपुर, जय प्रताप सिंह सिद्धार्थनगर, आशुतोष टंडन गोपाल लखनऊ उत्तर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.