आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी अतिरिक्त कॅलरीज बर्न केल्या जातात. यासाठी विविध प्रकारचे व्यायाम महिला व पुरूष करताना दिसतात. काही व्यायाम प्रकार खूपच अवघड असल्याने ते करताना अनेकांना कंटाळा येतो. मात्र, लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज सोपे असल्याने कॅलरी बर्न करण्याचा आणि फिटनेस कायम ठेवण्याचा तो उत्तम पर्याय आहे. त्याउलट हाय-इम्पॅक्ट एक्झरसाइज ऑर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस, लठ्ठपणा, सांधेदुखीस कारणीभूत व गर्भवतींसाठी हानिकारक असतात. त्यामुळे लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करणेच फायद्याचे ठरते.इम्पॅक्ट एक्झरसाइजमध्ये कोणत्या व्यायाय प्रकारांचा समावेश होतो आणि त्यातून किती कॅलरी बर्न होतात याची माहिती आपण घेऊयात.
पाय-या चढणे, शिड्या चढणे-उतरणे कार्डियो वर्कआउटसारखे आहे. ते कॅलरी बर्न करण्यात व हृदयासाठीही फायदेशीर असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. हा व्यायाम कधीही करता येतो. मॉल वा कार्यालयात लिफ्टचा वापर करण्याऐवजी पाय-यांचा वापर करावा. पोहणे हा सुद्धा यातीलच एक व्यायाम आहे. अधिक वजन, सांधेदुखीची समस्या वा ऑर्थरायटिसच्या पीडितांनी पोहू नये, हा गैरसमज आहे. ज्यांच्या शरीरात स्नायू कमी असतात, ते अत्यल्प कॅलरी बर्न करू शकतात. वाढत्या वयाबरोबरच स्नायूंचे नुकसान होते.
सायकलिंगमुळे कॅलरी बर्न होण्याबरोबरच शरीराचा स्टॅमिनाही वाढतो. सायकलिंग करताना वेग कमी-जास्त करत राहावा. त्यामुळे सांध्यांचा लवचीकपणा टिकून राहतो आणि शरीराची सक्रियता वाढते.
पर्किन्स यांच्या मते, ज्या लोकांना गुडघ्यांशी निगडित समस्या आहेत, त्यांनी सायकलिंगपासून दूर राहायला हवे. सायकलिंगमुळे गुडघ्यांवर अधिक दबाव पडतो. तो पीडितासाठी अधिक हानिकारकही ठरू शकतो. तसेच स्केटिंग हा सुद्धा प्रकार यातच मोडतो. नविन व्यक्तींनी स्केटिंग करताना सावधगिरी बाळगावी. यात सावरण्याची संधी मिळत नाही.जुंबा हा नृत्याचा एक प्रकार असला तरी कॅलरी बर्न करण्याबरोबरच तो हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या प्रकारात संगीताच्या तालावर हातांची हालचाल करावी लागते. सामुहिक नृत्य केल्यास या व्यायाम प्रकाराचा अधिक आनंद घेता येतो. त्यामुळे दैनंदिन जीवनही सुरळीत राहते. तसेच वॉकिंगदरम्यान शरीराचा प्रत्येक स्नायू कार्यप्रवण होतो. सुरुवातीस १० मिनिटांचा वॉक करावा. त्याबरोबरच जोपर्यंत ४५ मिनिटांचा वॉक होत नाही, तोपर्यंत दर आठवड्यास दहा टक्के वेळ वाढवावा. तसेच चालण्याची गतीही बदलत राहावी.