आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ब्लड प्रेशरची समस्या सध्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. जीवनशैलीसह अनेक कारणे या पाठीमागे आहेत. हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर असे दोन प्रकार यामध्ये असतात. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक लोकांना आपल्याला ब्लड प्रेशरची समस्या आहे, हेच माहित नसते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. लो ब्लड प्रेशनमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी याची कारणे आणि अन्य माहिती असणे खुप आवश्यक आहे.
लो ब्लड प्रेशरची कारणे
1 हृदयाची समस्या
हृदयाशी निगडीत समस्या शरीरात ब्लड सर्कुलेशनला प्रभावित करतात.
2 पोषकतत्वांची कमतरता
व्हिटॅमिन बी 12 आणि आयर्न यासारख्या पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे अॅनिमीया होतो. नंतर ब्लड प्रेशरची समस्याही होऊ शकते.
3 डिहायड्रेशन
पाणी कमी प्यायल्यामुळे हायड्रेशनची समस्या होते. यामुळे हा त्रास होऊ शकतो.
4 गर्भावस्था
गर्भवती महिलांना लो ब्लड प्रेशरचा धोका अधिक होऊ शकतो.
हे आहेत उपाय
1 मीठाचे सेवन कमी प्रमाणात सेवन करा.
2 भरपूर प्रमाणात पाणी प्या.
3 रोज एक कप बीटाचा रस सेवन करा.
4 एक कप हार्ड कॉफीही घेऊ शकता.
5 बदामाची पेस्ट कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
* तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच यावर उपाय करावेत.